vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विविध जलाशयांना आणि प्रकल्पांना भेट प्रत्यक्ष पाहणी. महापौर रितू तावडे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या विविध जलाशयांना आणि प्रकल्पांना भेट प्रत्यक्ष पाहणी..

मुंबई प्रतिनिधी

🔷मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत, स्थायी समिती, महानगरपालिका पदाधिकारी आणि प्रसारमाध्यम सहकारी यांनी, बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या विविध जलाशयांना आणि प्रकल्पांना आज भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच, जलसाठा, पाणीपुरवठा व्यवस्था व त्याचे आगामी नियोजन तसेच संबंधित कामांचा सविस्तर आढावा घेतला.

🔷सभागृहनेते श्री. गणेश खणकर, विरोधी पक्ष नेत्या श्रीमती किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे गटनेते श्री. अशरफ आजमी, एआयएमआयएमचे गटनेते श्री. विजय उबाळे, समाजवादी पक्षाच्या गटनेत्या श्रीमती अमरीन अब्रहानी, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष श्री. हरिष भांदिर्गे, स्थायी समिती सदस्य श्रीमती श्रद्धा जाधव, श्री. जमिर कुरेशी, डॉ. (श्रीमती) सईदा खान, श्रीमती प्रीती सातम, श्री. शिवकुमार झा, श्री. तेजिंदर तिवाना, श्री. प्रकाश दरेकर, श्रीमती मीनाक्षी पाटणकर, श्रीमती दीपमाला बढे, श्रीमती लक्ष्मी भाटिया, श्रीमती ट्युलिप मिरांडा, श्रीमती अजंता यादव त्याचप्रमाणे उप आयुक्त (विशेष अभियांत्रिकी) श्री. पुरुषोत्तम माळवदे, जल अभियंता श्री. मंगेश शेवाळे, प्रमुख अभियंता (पाणी पुरवठा प्रकल्प) श्री. दिलीप पाटील यांच्यासह अधिकारी, अभियंता, कर्मचारी दौऱ्यास उपस्थित होते.

🔷मुंबई महानगराच्‍या पाणीपुरवठा व्यवस्थेतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या पिसे – पांजरापूर संकुलास सर्व मान्यवर आणि पत्रकारांनी भेट दिली. 🔷प्रारंभी, पांजरापूर येथील जल शुद्धीकरण प्रकल्पाची सविस्तर माहिती घेतली.

🔷त्यानंतर, पिसे (ता.भिवंडी) येथे ४५५ दशलक्ष लीटर प्रतिदिन (MLD) क्षमतेचे नवीन उदंचन केंद्र (Pumping Station) तसेच नवीन बंधारा (New Pick Up Weir With Gate) बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. तसेच, आवश्यक ते निर्देश दिले.

🔷या पाहणीनंतर महापौर श्रीमती रितू तावडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मोडकसागर जलाशय आणि तानसा जलाशयास भेट दिली. तसेच, प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

संबंधित पोस्ट

परभणीतील शेतकऱ्यांना पाणी उपलब्धता वाढविण्यास प्राधान्य द्यावे – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर जलसंधारण व सिंचन क्षमतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे

मुंबई ठाण्यासह राज्यात दहीहंडी महोत्सव धुमधडाक्यात…

vishwatmaklokswamivarta

नरनाळा महोत्सवात ‘इन्व्हेस्टर्स मीट’ : पर्यटन क्षेत्रातील संधींबाबत मंथनगुंतवणूकदारांना सहभागी होण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

शिवसेना शिष्टमंडळाने घेतली नुतन पोलीस अधिक्षकांची भेट

मुंबई-गोवा महामार्गाची पालकमंत्री भरत गोगावले यांच्याकडून पाहणी चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी अडचणींच्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करा* 

मुंबईत सार्वत्रिक पारशी नोंदणी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

vishwatmaklokswamivarta