vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईत सार्वत्रिक पारशी नोंदणी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

मुंबईत सार्वत्रिक पारशी नोंदणी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

मुंबई प्रतिनिधी-

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने मुंबईत बॉम्बे पारशी पंचायतीच्या सहकार्याने आयोजित केलेल्या सार्वत्रिक पारशी नोंदणी मोहिमेच्या विशेष सुविधा शिबिराला आज प्रचंड प्रतिसाद मिळाला. शिबिरादरम्यान ‘जियो पारशी’ पोर्टलवर सुमारे 300 नवीन नोंदण्या पूर्ण झाल्या. ही मोहीम विविध योजनांचा लाभ पारशी समाजातील व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

जियो पारशी’ ही भारत सरकारची एक प्रमुख केंद्रीय योजना आहे. पारशी समाजाची घटणारी लोकसंख्या रोखणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.2013-14 मध्ये सुरू झालेली ही योजना, नियोजित उपाययोजना आणि वैज्ञानिक सहाय्याद्वारे पारशी लोकसंख्या स्थिर ठेवण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न करते.

या योजनेअंतर्गत खालील गोष्टी पुरवल्या जातात:वंध्यत्व उपचार आणि गर्भधारणेसंबंधित काळजीसाठी वैद्यकीय सहाय्य बालसंगोपन आणि परावलंबी वृद्ध व्यक्तींच्या देखभालीसाठी आर्थिक सहाय्यासह सामुदायिक आरोग्य सहाय्य समुपदेशन, जनजागृती मोहीम आणि संपर्क कार्यक्रमांद्वारे समाज प्रबोधन.

अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव श्यामा प्रसाद रॉय यांनी उपस्थितांना संबोधित करताना पारशी समाजाच्या कल्याणासाठी सरकारच्या निरंतर वचनबद्धतेचे आश्वासन दिले. पात्र लाभार्थ्यांनी पुढे येऊन योजनांचे लाभ घ्यावेत असे आवाहन त्यांनी केले. विविध योजनांची अंमलबजावणी अधिक मजबूत करण्यासाठी नोंदणीकृत सदस्यांनी अभिप्राय द्यावेत, असेही ते म्हणाले.शिबिराच्या यशस्वी आयोजनातून योजनेबद्दल वाढती जागरूकता आणि विश्वास दिसून येत असून पारशी समाजाचा समृद्ध सांस्कृतिक आणि लोकसंख्यात्मक वारसा जपण्याच्या सरकारच्या निर्धाराला अधिक बळ मिळाले.

संबंधित पोस्ट

निरखेडा येथील माजी ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपा मध्ये जाहीर प्रवेश

नागरिकांच्या सुविधेसाठी अधिकच्या परिवहन सेवेचे पर्याय निर्माण करावेत – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

शेतीसाठी कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांतील शासकीय ठेवी काढून घ्या- जिल्हाधिकारी संतोष पाटील  

मधमाशी पालनातून शेतकऱ्यांना सुवर्णसंधी; महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे ‘मधकेंद्र’ योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन

विशाल, अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन; 18 प्रस्तावांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी**•महाराष्ट्रात ₹2.56 लाख कोटींची गुंतवणूक आणि 1 लाखांहून अधिक रोजगारनिर्मितीचे लक्ष्य*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

vishwatmaklokswamivarta

विधान परिषद लक्षवेधी सूचना :चित्रपटांना सेन्सॉर करण्याचे अधिकार केंद्र शासनास- सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार