vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नमस्ते दिवस’ म्हणजे स्वच्छताकर्मींच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी – महापौर श्रीम.सुजाता पाटील

‘नमस्ते दिवस’ म्हणजे स्वच्छताकर्मींच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी – महापौर श्रीम.सुजाता पाटील

        नवी मुंबई प्रतिनिधी –    देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या सुपर स्वच्छ लीग मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या मानांकनामागे सर्वाधिक श्रेय आपल्या स्वच्छताकर्मींचे असून त्यांच्या समर्पित कामाप्रती कृतज्ञता अर्पण करण्यासाठी नमस्ते दिवस हे एक चांगले माध्यम आहे असे सांगत नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी आज स्वच्छताकर्मींना दिले जाणारे सुरक्षा साधनांचे पीपीई कीट हे त्यांचे जीवन आमच्यासाठी किती महत्वाचे आहे ही भावना व्यक्त करणारे असल्याचे मत मांडले.

            नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित नमस्ते दिवसानिमित्त पीपीई कीट वितरण समारंभप्रसंगी महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी आपल्या मनोगतात स्वच्छताकर्मी म्हणजे शहराच्या आरोग्याची सुरक्षा जपणारे स्वच्छता सैनिक अशा शब्दात त्यांच्या सेवाभावी कामाबद्दल अभिवादन केले. याप्रसंगी उपमहापौर श्री.दशरथ भगत, आयुक्त डॉ.कैलास शिंदे, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, घनकचरा व्यवस्थापन उपआयुक्त डॉ.अजय गडदे, अति.शहर अभियंता श्री.मदन वाघचौडे, परिवहन व्यवस्थापक श्री.उमाकांत जंगले, कार्यकारी अभियंता श्री.दीपक सूर्यराव, उपअभियंता श्री.स्वप्निल देसाई, मुख्य स्वच्छता अधिकारी श्री.राजूसिंह चव्हाण, कनिष्ठ अभियंता श्री.दिलीप बेनके व श्री.वैभव देशमुख, स्वच्छता निरीक्षक श्री.किरण सोळस्कर व इतर मान्यवर उपस्थित होते.

            याप्रसंगी बोलताना उपमहापौर श्री.दशरथ भगत यांनी नमस्ते दिन हा स्वच्छताकर्मींचा सन्मानदिन असल्याचे सांगत आपले स्वच्छता कर्मचारी नंबर वन असल्याचे मत व्यक्त केले. शहर आणि शरीर दोन्ही महत्वाचे असून शहराच्या आरोग्याची काळजी घेणा-या स्वच्छताकर्मींच्या कामाचा अभिमान वाटतो असे सांगताना उपमहापौरांनी आपले कर्मचारी आपल्या शहराची काळजी तर घेतातच मात्र आकस्मिक गरज भासल्यास इतर शहरांमध्येही मदतकार्यासाठी धावून जातात ही मोठी गोष्ट असल्याचे ते म्हणाले.

            महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी स्वच्छतेतून शहराचे आरोग्य जपण्यासाठी दररोज कार्यरत असणारे आपले स्वच्छतामित्र व सफाईमित्र आपत्कालीन स्थितीत युध्दपातळीवर मदतकार्यासाठी कार्यरत असतात, अगदी गरजेच्या वेळी इतर शहरांमध्येही जाऊन आपली सेवा बजावतात ही प्रशंसनीय गोष्ट असल्याचे सांगत नवी मुंबईच्या कार्यसंस्कृतीचे कौतुक होते ते तुमच्यामुळेच अशा शब्दात मनोगत व्यक्त केले. यापुढील काळात यांत्रिकी स्वच्छता अधिक सक्षम करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

            याप्रसंगी मलनि:स्सारण विभागातील 10 सफाईमित्र आणि स्त्री मुक्ती संघटनेच्या 10 परिसर सखी यांना प्रातिनिधिक स्वरूपात सुरक्षा साधनांचे पीपीई कीट महापौर श्रीम.सुजाता पाटील आणि मान्यवराच्या हस्ते वितरित करण्यात आले नमस्ते दिनानिमित्त महानगरपालिकेच्या 26 आरोग्य केंद्रामध्ये स्वच्छता मित्र स्वच्छतासखी करिता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

संबंधित पोस्ट

दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी १५ हजारांचे अर्थसहाय्य; ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

संरक्षित शेतीसाठीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करा – जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार

सी.एल.एम.सी मिल्क बँकेचा शुभारंभ सातारा जिल्हा रुग्णालयाचा नाविण्यपुर्ण उपक्रम

vishwatmaklokswamivarta

पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा गावासाठी टँकर मंजूर….

भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चित्ररथाच्या माध्यमातून संविधान प्रदर्शन

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यातील १० टपाल कार्यालयांमध्ये आधार सेवा उपलब्ध; नागरिकांनी लाभ घेण्याचे टपाल विभागाचे आवाहन