vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सुरंगीच्या सुगंधाने निसर्गोद्यान दरवळणार – महापौर, आयुक्त व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण

सुरंगीच्या सुगंधाने निसर्गोद्यान दरवळणार – महापौर, आयुक्त व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण

         नवी मुंबई प्रतिनिधी- सध्याची वातावरणाची स्थिती पाहता पर्यावरण संरक्षण व संवर्धनाला पर्याय नाही हे लक्षात घेत योग्य प्रकारे झाडे लावणे आणि त्यांचे संवर्धन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगत नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी नागरिकांना यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ‘हरित प्रभाग’ अर्थात ‘ग्रीन वॉर्ड’ स्पर्धा राबविण्याची संकल्पना जाहीर केली. या पर्यावरणपूरक वृक्षारोपण संवर्धन अभियानात सर्व प्रकारच्या संस्था, मंडळे, नागरिक यांनी आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी स्वयंस्फुर्तीने सहभागी व्हावे असेही आवाहन महापौरांनी केले. नवी मुंबई महानगरपालिका उद्यान विभागाच्या वतीने सेक्टर 14 कोपरखैरणे येथील निसर्गोद्यानामध्ये ‘माझी वसुंधरा अभियान 7.0’ अंतर्गत ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमाच्या अनुषंगाने आयोजित वृक्षारोपण समारंभप्रसंगी त्या उपस्थितांशी संवाद साधत होत्या.

          यावेळी महापौर श्रीम.सुजाता पाटील, आयुक्त डॉ.कैलास शिंदे, प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम.चंद्रभागा मोरे, आरोग्य समिती सभापती डॉ.जयाजी नाथ, पाणीपुरवठा समिती सभापती श्री.रविकांत पाटील, विधी समिती सभापती ॲड.सायली शिंदे, नगरसेवक श्री.संदीप म्हात्रे, श्री.डी.आर.पाटील, नगरसेविका ॲड.भारती पाटील, श्रीम.दिक्षा कचरे, श्रीम.मिनाक्षी पाटील आणि उद्यान विभागाच्या उपआयुक्त श्रीम.स्मिता काळे, कोपरखैरणे विभागाचे सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री.भरत धांडे, सहा. उद्यान अधिकारी श्री.भालचंद्र गवळी, उद्यान अधिक्षक श्री.विजय कांबळे, उद्यान सहाय्यक श्री.श्रीकांत जाधव तसेच मोठ्या संख्येने उपस्थित विविध संस्थांचे पदाधिकारी, शाळा – महाविद्यालयांचे मुख्याध्यापक – शिक्षक – विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

          याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी पर्यावरणाचा –हास रोखण्यासाठी सर्वांनी मिळून जागरूकतेने प्रयत्न करण्याची गरज विषद करीत ही आपल्या अस्तित्वाची लढाई असल्याचे सांगितले. विकास हा पर्यावरणाची काळजी घेऊनच व्हायला हवा हे स्पष्ट करीत नवी मुंबई क्षेत्रात होणारी वृक्षलागवड ही जैवविविधतेला नजरेसमोर ठेवून प्राधान्याने देशी प्रजातीच्या झाडांचीच होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेय

          नवी मुंबई महानगरपालिकेस पर्यावरण विषयक कामात सहकार्य करणा-या संस्थांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाल. सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये सुरंगी वृक्षरोपे पुरवठा करणारे ऑरम फाऊंडेशन, कॉन्सर्टो प्रा.लि.महापे, डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग, श्री आदिशक्ती निर्मलादेवी संस्था कोपरखैरणे, संत धन निरंकारी मंडळ कोपरखैरणे, श्रीविठ्ठल रखुमाई भजनी मंडळ कोपरखैरणे, मोरया सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ कोपरखैरणे, ज्ञानविकास संस्था कोपरखैरणे, क्राईस्ट अकॅडमी स्कुल सेक्टर 23 कोपरखैरणे, नमुंमपा शाळा क्र. 36 कोपरखैरणेगाव, सुनिल किंद्रे युवा फाऊंडेशन या सहयोगी संस्थेच्या पदाधिका-यांना सन्मानीत करण्यात आले.

          यावेळी विशेषत्वाने कर्नाटक राज्यातून आणलेल्या सुरंगी झाडाच्या 4 ते 5 फूट वाढलेल्या 200 वृक्षरोपांची निसर्गोद्यानात मान्यवर व नागरिकांच्या हस्ते लागवड करण्यात आली. सुरंगी हे मध्यम आकाराचे सुगंधी फुलांचे सदाहरित झाड प्रामुख्याने त्याच्या लोभस सुगंधासाठी व फुलांच्या अनोख्या रचनेसाठी ओळखले जाते. या वृक्षारोपणामुळे निसर्गोद्यानातील हा पट्टा सुरंगीच्या सुगंधाने आसमंत दरवळून टाकणार आहे.

00000

संबंधित पोस्ट

मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विभागाच्यामहत्वाकांक्षी प्रकल्पांना आशियाई विकास बँकेकडून निधी,मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची आशियाई विकास बँक अधिकारी यांच्याशी चर्चा

पुणे ग्रँड टूरमुळे पुण्यातील पर्यटन वाढेल; सायकलचे शहर ही जुनी ओळख पुन्हा प्रस्थापित होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘पुणे ग्रॅण्ड टूर २०२६’चे बोधचिन्ह आणि जर्सीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

vishwatmaklokswamivarta

शहीद बाळकृष्ण निकम यांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून सांत्वन शासनाकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

राज्य शासनाची भूमिका -. अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिकणे सक्तीचे असून, १६ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षणासंदर्भात बैठक

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या पुढाकाराने 11 ते 13 एप्रिल दरम्यान मध्‍य प्रदेशातील रायसेन येथे राष्ट्रीय स्तरावरील प्रगत कृषी महोत्सवाचे आयोजन

एसटी) डेपोच्या पुनर्विकासातून उत्पन्न वाढवून महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

vishwatmaklokswamivarta