vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

गणेशोत्सवात रक्तदानाचा सामाजिक संदेश द्या! डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर रक्त व प्लेटलेटची गरज वाढली,गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिरे घ्यावीत : गणेश चौधरी

गणेशोत्सवात रक्तदानाचा सामाजिक संदेश द्या! डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर रक्त व प्लेटलेटची गरज वाढली,गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिरे घ्यावीत : गणेश चौधरी

 

जालना (प्रतिनिधी) : गणेशोत्सव केवळ उत्सव म्हणून न साजरा करता त्याला सामाजिक बांधिलकीची जोड देत प्रत्येक गणेश मंडळाने आपल्या मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा गणेश चौधरी रक्तदाता समूह, जालना यांचे संस्थापक अध्यक्ष गणेश चौधरी यांनी केले आहे. सध्या डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने अनेक रुग्णांना रक्तातील प्लेटलेटची आवश्यकता भासत आहे. अशा परिस्थितीत वेळेवर रक्त व प्लेटलेट उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेटचा दीर्घकाळ साठा करून ठेवता येत नसल्याने नियमित रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आवश्यक असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

 

जालना जिल्ह्यात थॅलेसेमियाने त्रस्त असलेल्या सुमारे २६० पेक्षा अधिक लहान मुलांना नियमित रक्ताची आवश्यकता भासते. याशिवाय अपघातग्रस्त रुग्ण, प्रसूतीदरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होणाऱ्या महिला तसेच विविध आजारांवरील उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठीही रक्ताची गरज असते. त्यामुळे एका रक्तदान शिबिरातून अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते. गणेशोत्सवातील दहा दिवसांमध्ये प्रत्येक मंडळाने विविध कार्यक्रमांसोबत किमान एका दिवसाचा सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिर आयोजित करावे. मंडळांनी पुढाकार घेतल्यास रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना मोठा आधार मिळू शकतो, असे आवाहन गणेश चौधरी यांनी केले आहे. रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी मार्गदर्शन किंवा सहकार्य आवश्यक असल्यास ८३०८०७५३३६, ८३७९०२५५५ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

ठाणे जिल्ह्यात ‘अतिसार थांबवा’ मोहीम १६ जून ते ३१ जुलै दरम्यान राबविण्यात येणार

पथनाट्याच्या माध्यमातून जिल्ह्यात एचआयव्ही/एड्स जनजागृती मोहीम

vishwatmaklokswamivarta

कुष्ठरुग्ण शोध अभियान 2025

vishwatmaklokswamivarta

डॉ. देवेश पाथ्रीकर यांना राज्यस्तरीय आरोग्यरत्न पुरस्कार

३० खाटांच्या रुग्णालयांना जन आरोग्य योजनेत समावेश करता येणार १० खाटांच्या एकल विशेषता रुग्णालयांनाही संधी पॅनलवर समावेशासाठी रुग्णालयांनी ऑनलाइन अर्ज करावा जिल्हा शल्यचिकीस्तक डॉ दत्तात्रय बिरासदार यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हात पाय बसविण्यासाठी शिबीरांचे आयोजन