vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सारथी उपकेंद्र, कोल्हापूरमार्फत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा लक्षित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठीविविध योजना व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी…

सारथी उपकेंद्र, कोल्हापूरमार्फत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा लक्षित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठीविविध योजना व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी…

    राज्य प्रतिनिधी    महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या लक्षित घटकांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व कौशल्यविकासासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) कार्यरत आहे. कंपनी कायदा, २०१३ मधील कलम ८ अन्वये स्थापन झालेल्या सारथी संस्थेचे मुख्यालय पुणे येथे दिनांक २५ जून २०१८ रोजीपासून कार्यरत असून, कोल्हापूर येथे दिनांक २६ जून २०२१ रोजी उपकेंद्राची स्थापना झाली आहे.

सारथी उपकेंद्र, कोल्हापूरच्या कार्यक्षेत्रात कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश असून, या चारही जिल्ह्यांतील लक्षित घटकांपर्यंत सारथीच्या विविध योजनांचा लाभ पोहोचविण्यात येत आहे.

स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश,सारथीच्या विविध स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण उपक्रमांमुळे लक्षित गटातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळत आहे. सन २०२० ते २०२५ या कालावधीत UPSC नागरी सेवा परीक्षेत एकूण १४४ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. यामध्ये २३ IAS, २१ IPS, २० IRS व २४ CAPF यशस्वी उमेदवारांचा समावेश आहे. यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातील ५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

तसेच सन २०२० ते २०२४ या कालावधीत MPSCच्या विविध परीक्षांमध्ये एकूण ९५५ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. यामध्ये राज्यसेवा, वनसेवा, कृषी सेवा, अभियांत्रिकी सेवा, न्यायिक सेवा, अराजपत्रित दुय्यम सेवा, निरीक्षक वैध मापनशास्त्र आदी परीक्षांचा समावेश आहे. यापैकी कोल्हापूर जिल्ह्यातील ६० विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.परदेशी उच्च शिक्षणासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना मोठी आर्थिक मदत,महाराजा सयाजीराव गायकवाड सारथी गुणवंत मुलामुलींना परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत QS Ranking 200 च्या आत असलेल्या विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रति विद्यार्थी प्रतिवर्षी रु. ३० लाख, तर Ph.D. अभ्यासक्रमासाठी प्रति विद्यार्थी प्रतिवर्षी रु. ४० लाख शिष्यवृत्ती देण्यात येते.

सन २०२३-२४ ते २०२५-२६ या कालावधीत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांतील ३१ विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्यांच्यासाठी सुमारे रु. १८.६० कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे.देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी ६५९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीडॉ. पंजाबराव देशमुख सारथी उच्चशिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत देशातील नामवंत २०० विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, लायब्ररी शुल्क, परीक्षा शुल्क, वसतिगृह शुल्क व भोजन शुल्काची १०० टक्के प्रतिपूर्ती केली जाते. तसेच पुस्तकांसाठी रु. ५,००० अतिरिक्त देण्यात येतात.

सन २०२२-२३ ते २०२४-२५ या कालावधीत महाराष्ट्रात ६५९ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असून, सारथी उपकेंद्र कोल्हापूरच्या कार्यक्षेत्रातील ६९ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.CSMNRF अंतर्गत ४२७ संशोधक विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्ती

छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF) योजनेअंतर्गत Ph.D. संशोधक विद्यार्थ्यांना JRF व SRF स्वरूपात अधिछात्रवृत्ती दिली जाते. JRF कालावधीत प्रतिमहा रु. ३७,०००, तर SRF कालावधीत प्रतिमहा रु. ४२,००० तसेच UGC नियमानुसार घरभाडे भत्ता व आकस्मिक खर्च देण्यात येतो.सन २०१९ ते २०२३ या कालावधीत सारथी उपकेंद्र, कोल्हापूरच्या कार्यक्षेत्रातील ४२७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. सन २०२५-२६ मध्ये १६९ विद्यार्थ्यांना रु. १५ कोटी ८४ लाख ६५ हजार ७७७ अधिछात्रवृत्ती वितरीत करण्यात आली आहे.

उद्योजकता विकासासाठी इनक्युबेशन उपक्रमसरसेनापती संताजी घोरपडे उद्योजकता विकास उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना दरमहा रु. २५,००० विद्यावेतन, तर इनक्युबेशन केंद्रांना प्रति विद्यार्थी दरमहा रु. ५,००० व्यवस्थापन शुल्क देण्यात येते. SUKRDF, कोल्हापूर व NETRARIT Foundation, इस्लामपूर या दोन केंद्रांद्वारे सन 2024-25 व 2025-26 या दोन बॅचमध्ये एकूण १६ विद्यार्थ्यांना इनक्युबेशनचा लाभ मिळाला असून, एकूण रु. ४७.७२ लाख निधी वितरीत करण्यात आला आहे.तांत्रिक कौशल्य प्रशिक्षणासाठी IGTR उपक्रम,श्रीमंत मालोजीराजे भोसले सारथी व इंडो जर्मन टूल रूम (IGTR) प्रशिक्षण उपक्रमाअंतर्गत शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील IGTR प्रशिक्षण केंद्रामार्फत तांत्रिक कौशल्यावर आधारित Jr. Designer CAD/CAM व Frontline Jr. Supervisor – Construction या दोन अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण मोफत देण्यात येते. सन २०२२-२३ ते २०२५-२६ या कालावधीत एकूण २३७ विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला आहे.

CSMS-DEEP प्रशिक्षणातून संगणक व व्यक्तिमत्व विकासाला चालना,छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम (CSMS-DEEP) हा उपक्रम MKCLच्या माध्यमातून सारथीच्या उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. एकूण ३१२ प्रशिक्षण केंद्रांद्वारे Spoken English, Soft Skills, IT Skills, Accounting with Tally, Hardware & Networking, Web Designing, Data Management, Digital Freelancing, Mobile App Development आदी विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते

आजअखेर १३,४०३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, त्यापैकी ५,२६० विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांपैकी १,३७७ विद्यार्थ्यांना रोजगार प्राप्त झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ८,२२९ विद्यार्थ्यांपैकी ३,१६२ विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, ६२९ विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला आहे. या उपक्रमामुळे लक्षित गटातील युवकांच्या संगणक व व्यावसायिक कौशल्यविकासासह रोजगाराच्या संधींना चालना मिळत आहे.

महिलांसाठी रोजगार व स्वयंरोजगार कौशल्य प्रशिक्षण,महाराणी सईबाई सारथी रोजगार व स्वयंरोजगार कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेअंतर्गत सन 2024-25 या वर्षात बेकरी प्रॉडक्ट मेकिंग, दुग्धव्यवसाय व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, राईस प्रोसेसिंग, मसाले निर्मिती व गारमेंट मेकिंग या विविध प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील ५ प्रशिक्षण केंद्रांमधून एकूण १५० उमेदवारांनी प्रशिक्षण घेतले असून, यामध्ये १३४ महिला व १६ पुरुष उमेदवारांचा समावेश आहे

कृषी व आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षण,सारथी मार्फत लक्षित गटातील युवक, शेतकरी व पशुपालकांसाठी विविध कृषी व कृषीपूरक व्यवसाय प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये ड्रोन पायलट प्रशिक्षण, FPO संचालक/सभासदांसाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण, मधुमक्षिकापालन, कृषी विज्ञान केंद्रामार्फत अल्प मुदतीचे प्रशिक्षण, मुरघास प्रशिक्षण आणि कृत्रिम रेतन प्रशिक्षण यांचा समावेश आहे.

या प्रशिक्षणांच्या माध्यमातून आधुनिक कृषी तंत्रज्ञान, कौशल्यविकास, कृषीपूरक व्यवसाय तसेच रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधींना चालना देण्याचा सारथीचा उद्देश आहे. या प्रशिक्षणांसाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ आहे.

परदेशी भाषा शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना:छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) मार्फत लक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी “परदेशी भाषा शिक्षण व प्रशिक्षण शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना सन २०२६-२७” राबविण्यात येत आहे. महाराष्ट्रातील UGC Act १२(B) अंतर्गत येणाऱ्या विद्यापीठे तसेच संलग्न शासकीय मान्यताप्राप्त अनुदानित संस्था व महाविद्यालयांमध्ये परदेशी भाषा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.योजनेअंतर्गत जर्मन, जपानी, स्पॅनिश, फ्रेंच, चिनी, रशियन, पोर्तुगीज तसेच इंग्रजी वगळता इतर विदेशी भाषांच्या प्रमाणपत्र, पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या सन २०२६-२७ मध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांना नियमानुसार शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ मिळणार आहे.योजनेची जाहिरात सारथीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक ०६ ऑक्टोबर २०२६ आहे.

सारथी उपकेंद्राच्या नवीन इमारत संकुलाचे बांधकाम प्रगतीपथावर,राजाराम महाविद्यालय परिसरात छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), उपकेंद्र, कोल्हापूर यांच्या कार्यालयीन इमारतीसह संग्रहालय व अभ्यासिका, मुलांचे व मुलींचे वसतिगृह, उपहारगृह इत्यादी विविध बांधकामांची कामे प्रगतीपथावर आहेत. मुलांचे व मुलींचे प्रत्येकी १२ मजली वसतिगृहांचे RCC बांधकाम पूर्ण झाले असून सध्या अंतर्गत व अनुषंगिक कामे प्रगतीपथावर आहेत. सदर वसतिगृहांची कामे पूर्ण करून ती लवकरच कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही सुरू आहे. वसतिगृहे सुरू झाल्यानंतर सारथीच्या लक्षित गटातील विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुसज्ज व दर्जेदार निवासाची सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार असून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस तसेच उच्च शिक्षणाच्या संधींना यामुळे मोठी चालना मिळणार आहे.सारथी उपकेंद्र, कोल्हापूरमार्फत शैक्षणिक प्रगतीसोबतच कौशल्यविकास, रोजगार, स्वयंरोजगार, उद्योजकता, संशोधन, परदेशी व देशांतर्गत उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांमध्ये लक्षित घटकातील युवक-युवतींना सक्षम करण्यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. या माध्यमातून “शिक्षणातून प्रगती, कौशल्यातून रोजगार आणि गुणवत्तेतून विकास” या उद्दिष्टाला चालना देण्यात येत आहे.

अजय पवार

सहव्यवस्थापकीय संचालक,

सारथी उपकेंद्र, कोल्हापूर

0000

 

संबंधित पोस्ट

दि.5ऑगस्ट रोजी पनवेल येथे जनता दरबाराचे आयोजन ….       

बारामती रेल्वे स्थानकाला आधुनिकतेची नवी ओळख!

मराठवाड्यात शिवसेनेचा नवा चेहरा डॉ. संजय लाखे पाटील यांच्यावर दुहेरी जबाबदारी..शिवसेना पक्ष संघटनेतील महत्वाच्या पक्ष सचिव पदा सह सहमुख्य संपर्क प्रमुख मराठवाडा (नांदेड आणि हिंगोली जिल्हा शिवसेना पक्षसंघटना) नियुक्ती करून मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा पुन्हा विश्वास

भारताची पहिलीने सर्वात पहिले स्वदेशी सर्वेक्षण नौका (एसव्हीएल)एनआयएस संधायक मलेशियातील क्लांग बंदराला भेट दिली

वारणा धरणात 29.09 टी.एम.सी. पाणीसाठा

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, (MCED) तर्फे ‘इम्पोर्ट एक्सपोर्ट’ प्रशिक्षण