vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मराठवाड्यात शिवसेनेचा नवा चेहरा डॉ. संजय लाखे पाटील यांच्यावर दुहेरी जबाबदारी..शिवसेना पक्ष संघटनेतील महत्वाच्या पक्ष सचिव पदा सह सहमुख्य संपर्क प्रमुख मराठवाडा (नांदेड आणि हिंगोली जिल्हा शिवसेना पक्षसंघटना) नियुक्ती करून मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा पुन्हा विश्वास

मराठवाड्यात शिवसेनेचा नवा चेहरा डॉ. संजय लाखे पाटील यांच्यावर दुहेरी जबाबदारी..शिवसेना पक्ष संघटनेतील महत्वाच्या पक्ष सचिव पदा सह सहमुख्य संपर्क प्रमुख मराठवाडा (नांदेड आणि हिंगोली जिल्हा शिवसेना पक्षसंघटना) नियुक्ती करून मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा पुन्हा विश्वास

 

जालना (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षात मराठवाड्यातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मोठी राजकीय नियुक्ती जाहीर करण्यात आली असून डॉ. संजय लाखे पाटील यांच्यावर शिवसेना पक्षाने दुहेरी जबाबदारी सोपवली आहे. शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार डॉ. संजय लाखे पाटील यांची शिवसेना पक्ष संघटनेतील महत्वाच्या पक्ष सचिव पदासह सहमुख्य संपर्क प्रमुख मराठवाडा (नांदेड आणि हिंगोली जिल्हा शिवसेना) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या नियुक्ती पत्रानुसार, ही नियुक्ती एक वर्षासाठी करण्यात आली असून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्यपद्धतीचा प्रचार-प्रसार करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

विशेष म्हणजे नुकतीच महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्यपदी डॉ. संजय लाखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. अर्ध-न्यायिक अधिकार असलेल्या या वैधानिक आयोगावर काम करण्याची जबाबदारी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला होता. त्यानंतर आता पक्ष संघटनेतही महत्त्वाची भूमिका देण्यात आल्याने मराठवाड्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 डॉ. संजय लाखे पाटील यांनी नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, तसेच पक्षातील मंत्री, आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे काम करणार, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मराठवाड्यात शिवसेना संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पक्ष नेतृत्वाने युवा आणि संघटनात्मक अनुभव असलेल्या नेतृत्वावर भर दिल्याचे या नियुक्तीतून स्पष्ट होत आहे. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर डॉ. संजय लाखे पाटील यांची नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. शिवसैनिकांमध्ये सध्या एकच चर्चा रंगली आहे. संघटन, समाजकारण आणि प्रशासन या तिन्ही पातळ्यांवर काम करणाऱ्या नेतृत्वाला आता पक्षाने मोठी ताकद दिली आहे.0000

संबंधित पोस्ट

स्व – संरक्षण प्रशिक्षण वर्गातून विद्यार्थिनी होतील आत्मनिर्भर- जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते,जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेच्या विद्यमाने वीरांगना प्रशिक्षण सुरू

vishwatmaklokswamivarta

जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; २८ एप्रिलला होणार मतदान..

मदरशांचे ५० लाखांचे अनुदान थांबवून त्यांचे सामान्य शाळांत रूपांतर करा!- हिंदु जनजागृती समितीची राज्यशासनाकडे मागणी,उत्तर प्रदेशाच्या धर्तीवर मदरशांचे सर्वेक्षण करा; अन्यथा राज्यभर जनआंदोलन छेडण्याचा इशारा 

राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस प्रशासनाने सतर्क राहून मदत कार्य करावे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना निर्देश

संस्कार ‘च्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतली क्षेत्रभेटीतून उद्योगांची माहिती

vishwatmaklokswamivarta

करजगी बालिका अत्याचार प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी प्रयत्न करणार- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

vishwatmaklokswamivarta