vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अनधिकृत सागरी मासेमारीच्या१,०४५ प्रकरणांत १५ कोटी ४६ लाख रुपयांचा दंड नियमित गस्त, विशेष पथके आणि ड्रोनद्वारे देखरेख..

अनधिकृत सागरी मासेमारीच्या१,०४५ प्रकरणांत १५ कोटी ४६ लाख रुपयांचा दंड नियमित गस्त, विशेष पथके आणि ड्रोनद्वारे देखरेख..

 मुंबई, प्रतिनिधी : राज्याच्या सागरी हद्दीत अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागामार्फत नियमित गस्त, विशेष पथकांद्वारे देखरेख आणि कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. नोव्हबर २०२१ ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत अनधिकृत मासेमारीविरुद्ध एकूण १,०४५ प्रतिवेदने दाखल करण्यात आली असून, त्यापैकी ९७६ प्रतिवेदने निकाली काढण्यात आली आहेत. या प्रकरणांमध्ये एकूण १५.४६ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, ९.३९ कोटी रुपये वसूल करण्यात आले असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्यातील सागरी मत्स्यसंपत्तीचे संवर्धन, अनधिकृत मासेमारीस प्रतिबंध आणि सागरी मासेमारीविषयक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ तसेच सुधारणा अधिनियम, २०२१ अन्वये विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे. अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अंमलबजावणी अधिकारी, सुरक्षा रक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने गस्त घालण्यात येते. तसेच, अनधिकृत एलईडी आणि पर्ससीन मासेमारीला आळा घालण्यासाठी विशेष पथके गठित करण्यात आली आहेत.

विविध प्रकारच्या अनधिकृत मासेमारीविरुद्ध कारवाई,विभागामार्फत एलईडी व एलईडी पर्ससीन, पर्ससीन व मिनी पर्ससीन, ट्रॉलिंग तसेच परप्रांतीय मासेमारी नौकांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. उपलब्ध नोंदीनुसार, पर्ससीन व मिनी पर्ससीन मासेमारीच्या प्रकारात ३६४ प्रतिवेदने दाखल करण्यात आली आहेत. एलईडी व एलईडी पर्ससीन मासेमारीच्या प्रकरणांमध्ये ७.४९ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच, परप्रांतीय मासेमारी नौकांविरुद्ध १०३ प्रतिवेदने दाखल करून ३.१५ कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे

नवीन मासेमारी हंगामात ३१ नौकांवर कारवाई,नवीन मासेमारी हंगामात अनधिकृत मासेमारी करणाऱ्या ३१ नौकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. जिल्हानिहाय कारवाईमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात १२, मुंबई शहर जिल्ह्यात ९, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७, रायगड जिल्ह्यात २, तर ठाणे-पालघर जिल्ह्यात १ प्रकरण नोंदविण्यात आले आहे.ड्रोनद्वारेही अनधिकृत मासेमारीवर देखरेख,अनधिकृत मासेमारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोनद्वारे प्राप्त माहितीच्या आधारेही कारवाई करण्यात येत आहे. उपलब्ध अहवालानुसार, ड्रोनद्वारे नोंदविण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये एकूण ३,४२४ प्रतिवेदने दाखल करण्यात आली आहेत. या प्रकरणांमध्ये २.३० कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला असून, ६२.६२ लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.

सागरी मत्स्यसंपत्तीचे संरक्षण, कायदेशीर मासेमारी पद्धतींना प्रोत्साहन आणि अनधिकृत मासेमारीला प्रतिबंध करण्यासाठी विभागामार्फत नियमित गस्त, विशेष पथकांद्वारे देखरेख आणि कायद्यानुसार कारवाई सुरू राहणार आहे. सर्व मच्छीमारांनी लागू असलेल्या कायद्यांचे व नियमांचे पालन करून विभागाच्या कार्यवाहीस सहकार्य करावे, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागामार्फत करण्यात आले आहे.

 ‘अनधिकृत सागरी मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागामर्फत करण्यात येत असलेली कारवाई ही मच्छीमारांसाठी सुरक्षा कवच आहे. या कक्षाने अतिशय उत्तम कामगिरी केली असून यामुळे अधिकृत मासेमारी करणा-यांचे अधिकार सुरक्षित ठेवण्याचे मोठे काम केले आहे. ही कारवाई आणखी प्रभावी व्हावी यासाठी २ गस्ती नौका आणि ९ ड्रोन घेण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. लवकरच ही यंत्रणाही अंबलबजावणी साठी दाखल होईल आणी या कारवाईला आणखी बळ मिळेल, अशी प्रतिक्रिया मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.

00000

 

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा सुरळीतझाल्याबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना…

जिंतूर येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक नागरिकांपर्यंत कल्याणकारी योजनांचा लाभ पाहोचविण्यास शासन कटीबध्द – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

जिल्ह्यात ‘चायनीज मांजा’वर दोन महिन्यांची बंदी

नाशिक कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही– मंत्री उदय सामंत

🔥 उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर आरटीओ सेवा वेळेत बदल 🚗

महिला दिनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विद्यार्थिनींचे औक्षण करून स्त्रीशक्तीचा अनोखा सन्मान- ‘नारीशक्ती संवाद’ कार्यक्रमातील भावनिक क्षण