vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा सुरळीतझाल्याबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना…

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा सुरळीतझाल्याबाबत अत्यंत महत्त्वाची सूचना…

 

नवी मुंबई प्रतिनिधी-    नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पाणीपुरवठा करणारीमोरबे धरणाची 2050 मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राजवळ लिकेजझालेली होती. त्यामुळे भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास होणारा पाणीपुरवठा दुरुस्ती कामासाठी तातडीने बंदकरण्यात आला होता.

          सद्यस्थितीत नवीमुंबई महानगरपालिकेमार्फत मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचेकाम युद्धपातळीवर हाती घेऊन 3.15 वाजता निर्धारित वेळेअगोदर पूर्ण झालेले आहे.त्यानुसारभोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील पंपिंग यंत्रणा कार्यान्वित करून पाणीपुरवठा सुरूकरण्यात आलेला आहे.

           त्यामुळे नवीमुंबई महानगरपालिका क्षेत्रास व सिडको क्षेत्रातील खारघर व कामोठे येथे होणारा आज संध्याकाळचापाणी पुरवठा कमी दाबाने व कमी प्रमाणात होईल. तसेच उद्या सकाळचा पाणीपुरवठा नियमितप्रमाणेहोईल, याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी.नागरिकांनी पाणी जपून वापरावे व नवी मुंबई महानगरपालिकेस सहकार्यकरावे असे आवाहन करण्यात येत आहे.*अतिरिक्त शहर अभियंता (स्थापत्य)* *नवी मुंबई महानगरपालिका*

000000

संबंधित पोस्ट

सहकारी संस्थांसाठी चौकशी प्राधिकृत अधिकारी नामतालिका ; अर्ज 30 एप्रिल पर्यंत करण्याचे आवाहन

आषाढी पालखी सोहळा-२०२६ वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

पारपत्र अर्जामध्ये दिलेल्या पत्त्याची चोख पडताळणी करणार-गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला अखेर  रुग्णालयातून डिस्चार्ज…

vishwatmaklokswamivarta

खडकुत ते जांभरुन फाटापर्यंत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक लगतच्या एकेरी मार्गाने …

रिपब्लिकन पक्षाच्या केरळ प्रदेश अध्यक्षपदी नुसरत जहा यांची नियृक्ती – केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली अधिकृत घोषणा*

vishwatmaklokswamivarta