vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कृषी विद्यापीठांनी पारंपरिक देशी बियाण्यांचे उन्नतीकरण करावे : राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना राज्यात ‘नैसर्गिक शेती’ची क्रांती आणण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा

कृषी विद्यापीठांनी पारंपरिक देशी बियाण्यांचे उन्नतीकरण करावे : राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना

राज्यात ‘नैसर्गिक शेती’ची क्रांती आणण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा.

मुंबई, प्रतिनिधी : जागतिक हवामानाचे गंभीर संकट लक्षात घेऊन राज्यातील कृषी विद्यापीठांनी पारंपरिक देशी बियाणांना संस्कारित करून त्यांचे उन्नतीकरण करावे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील शेतकऱ्यांना उत्पन्न मिळेल अशा प्रकारचे बियाणे निर्माण करावीत असे सांगताना कृषी विद्यापीठांनी राज्यात नैसर्गिक शेतीची क्रांती आणण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती आचार्य देवव्रत यांनी केले.

लोकभवन मुंबई येथून कृषि विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच राज्यातील कृषी व पशुविज्ञान विद्यापीठांच्या कुलगुरूंशी दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधताना राज्यपाल बोलत होते.

ठकीला कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी, ‘पोकरा’चे प्रकल्प संचालक परिमल सिंह, राज्यातील कृषी तसेच पशुविज्ञान विद्यापीठांचे कुलगुरु, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, ‘आत्मा’चे संचालक सुनील बोरकर व कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

करीत बियाणे शेतकऱ्यांसाठी संकट असून ते महाग देखील आहे. त्यांचा वापर केल्यास रासायनिक खते देखील जास्त लागतात. उत्पादित अन्नधान्याला चव नसते व त्याचे पोषणमूल्य देखील कमी असते. त्यामुळे कृषी विद्यापीठांनी पारंपरिक बियाण्यांवर संशोधन करुन त्याचे उन्नतीकरण करावे, असे राज्यपालांनी सांगितले.

सर्व कृषी विज्ञान केंद्रांनी नैसर्गिक शेतीच्या प्रचार प्रसारासाठी ‘मॉडेल फार्म’ विकसित करावे व शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करावी असे राज्यपालांनी सांगितले. नैसर्गिक शेती ही लोकचळवळ झाली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सर्गिक शेती हे पवित्र असे ईश्वरी कार्य आहे. भावी पिढ्यांच्या अन्नसुरक्षेसाठी जमिनीचा पोत सुधारायचा असेल तर नैसर्गिक शेतीशिवाय गत्यंतर नाही. बरेचदा शेतकरी थेट दुकानदारांकडे जाऊन दुकानदार सांगतील त्या प्रमाणात युरिया, डीएपी, कीटकनाशके खरेदी करतात व शेतात वापरतात. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. या दृष्टीने विद्यापीठांनी शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे असेही राज्यपालांनी सांगितले.

गुजरात मधील चार कृषी विद्यापीठे गेल्या तीन वर्षांपासून नैसर्गिक शेती या विषयावर संशोधन करीत आहे. त्यामुळे राज्यातील विद्यापीठांनी त्या विषयावर नव्याने संशोधन सुरु न करता गुजरातमधील संशोधन पुढे न्यावे. त्यांनी तयार केलेल्या संशोधन पत्रिका व पुस्तके राज्यातील विद्यापीठांना उपलब्ध करून देऊ असे राज्यपालांनी सांगितले.

आपण अलीकडे गावागावांमध्ये जाऊन लोकांमध्ये नैसर्गिक शेतीबाबत जनजागृती करीत आहोत, असे राज्यपालांनी सांगितले. अशाच एका भेटीमध्ये आणंद जिल्ह्यात २५ गावांमध्ये आज भूमिगत जलस्त्रोतांमध्ये नायट्रेट आढळून आले असून पाणी पिण्यायोग्य राहिले नाही, ही गोष्ट निदर्शनास आली. दूषित पाण्यांमुळे लोकांना गंभीर आजार होत आहेत. या दृष्टीने रसायनांच्या वापराबाबत जागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्याकडे एक गाय असली तरी देखील शेती करता येते हे त्यांना पटवून द्यावे लागेल. महाराष्ट्रात साहिवाल, थारपारकर, कांकरेज, गीर आदी देशी गायींचे संवर्धन केले गेल्यास ते शेतीला वरदान ठरेल व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल असेही राज्यपालांनी सांगितले. यावेळी ‘आत्मा’चे संचालक सुनील बोरकर यांनी सादरीकरण केले.

आपण महाराष्ट्रात नैसर्गिक शेती विषयावर घेतलेल्या दोन परिसंवादानंतर कृषी विभाग व विद्यापीठांनी हे कार्य सकारात्मक पद्धतीने हाती घेतले याबद्दल राज्यपालांनी समाधान व्यक्त केले.००००

संबंधित पोस्ट

पीएमयू’च्या बैठकीत राज्यातील विकासप्रकल्पांचा आढावा विलंबामुळे प्रकल्पाच्या किंमती वाढतात;नियोजित वेळेत विकासकामे मार्गी लावावी- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६लातूर जिल्ह्यात १ हजार ७४७ केंद्रांवर शनिवारी मतदान; प्रशासनाची तयारी पूर्ण-· मतदान पथके रवाना; ८ हजार ४१४ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश· जिल्हा परिषदेसाठी २४२, तर पंचायत समित्यांसाठी ४१९ उमेदवार निवडणूक रिंगणात-· मतदान यंत्रावर जिल्हा परिषदसाठी पांढऱ्या, पंचायत समितीसाठी गुलाबी मतपत्रिका

vishwatmaklokswamivarta

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (#बार्टी) तर्फे राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी आर्थिक सहाय्य योजना जाहीर – 

vishwatmaklokswamivarta

जालना : शासकीय परिचारिका महाविद्यालयात पॉश कायदा व सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

ध्वनीची विहित मर्यादा राखून विशिष्ट सण, उत्सवासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सवलत

vishwatmaklokswamivarta

बसस्थानक मार्गावर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांचा अर्धकृती पुतळा बसविण्यात यावा.पीसीएम जालनाची मनपा आयुक्तांंकडे मागणी

vishwatmaklokswamivarta