vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बसस्थानक मार्गावर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांचा अर्धकृती पुतळा बसविण्यात यावा.पीसीएम जालनाची मनपा आयुक्तांंकडे मागणी

बसस्थानक मार्गावर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांचा अर्धकृती पुतळा बसविण्यात यावा.पीसीएम जालनाची मनपा आयुक्तांंकडे मागणी

जालना । प्रतिनिधी – दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा अर्धकृती पुतळा उभारण्यासह बसस्थानक-लक्कडकोट-भोकरदन नाका- छत्रपती संभाजीनगर या मार्गास त्यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र (पीसीएम) जालनाच्यावतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. आयुक्तांसाठी ओएस विजय फुलंब्रीकर यांनी निवेदन स्विकारले. यावेळी पीसीएमचे जिल्हाध्यक्ष दीपक शेळके, शहराध्यक्ष सुहास वैद्य, संदीप भाकरे, नरेंद्र जोगड आदींची उपस्थिती होती. प्रसंगी ओएस विजय फुलंब्रीकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

पीसीएम जालनाच्यावतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दर्पणकार बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांचा जन्म 20 फेब्रुवारी 1812 रोजी झाला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी मराठी वृत्तपत्र दर्पण हे 6 जानेवारी 1832 रोजी काढले. त्यानंतर मराठीतले पहिले मासिक ’दिग्दर्शन’ त्यांनी इ.स. 1840 साली सुरू केले. मराठी वृत्तपत्र क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्याच बरोबर विधवा पुनर्विवाह, स्त्री-शिक्षण यांचा त्यांनी पुरस्कार केला. अनिष्ठ रुढी परंपरा बंद करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांचे सामाजिक कार्यही मोठे आहे. महाराष्ट्र शासनाने 6 जानेवारी हा दर्पण दिन तथा पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केलेली आहे. त्याच बरोबर 20 फेब्रुवारी या दिवशी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्याचे आदेशही महाराष्ट्र शासनाने दिलेले आहेत.

दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे पत्रकारांचे आराध्य दैवत आहेत. या महापुरुषांचा अर्धकृती पुतळा जालना शहर महानगर पालिका हद्दीत बसविण्यात यावा. जालना शहरात विविध वृत्तपत्रांचे कार्यालय हे लक्कडकोट, छत्रपती संभाजीनगर रोड, भोकरदन नाका, छ.संभाजीनगर आदी भागात आहेत. त्यामुळे या मार्गास दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव या देण्यात यावे.

अर्धकृती पुतळा उभारण्यासह छत्रपती संभाजीनगर रोडला बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव येत्या 18 मे 2025 पर्यंत देण्यात यावे, अन्यथा प्रेस कॉन्सील ऑफ महाराष्ट्र जालनाच्यावतीने लोकशाही मार्गाने आंदोलनाचा ईशाराही देण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

वाहन चालकांसाठी मोठी बातमी -वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यास ३० जूनपर्यंत मुदतवाढ

हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया करच’- श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती*भारतीय अर्थव्यवस्थेला खिळखिळी करणारी ‘हलाल अर्थव्यवस्था’ मोडून काढणे आवश्यक !

बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा मागण्या मान्य न झाल्यास जालना जिल्हाभर तीव्र आंदोलनाचा इशारा…

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्हा-लातूर जिल्ह्यात रात्रभर संततधार पाऊस सुरू असून खालील मार्गावर पुलावर पाणी आल्याने सदर मार्गावरील एस. टी.बस वाहतूक बंद विविध ठिकाणी पावसामुळे बंद असल्याने नागरिकांच्या माहितीकरिता

इतर मागास बहुजन कल्याण विभागात महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी 31 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन प्रवेशिका उपलब्ध