vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया करच’- श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती*भारतीय अर्थव्यवस्थेला खिळखिळी करणारी ‘हलाल अर्थव्यवस्था’ मोडून काढणे आवश्यक !

हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया करच’- श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती*भारतीय अर्थव्यवस्थेला खिळखिळी करणारी ‘हलाल अर्थव्यवस्था’ मोडून काढणे आवश्यक !*

 

  *कोल्हापूर प्रतिनिधी- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच ‘गोकुळ’ने ‘हलाल’ प्रमाणपत्र घेतल्याचे समोर आले आहे. ‘हलाल’प्रमाणपत्र देणारी ‘जमियत उलेमा हिंद’ ही संघटना ७०० हून अधिक आतंकवाद्यांचे खटले लढवते आणि हा पैसा जे प्रमाणपत्र घेतात त्यांच्या माध्यमातून गोळा करत आहे. सामान्य शेतकर्‍याला अंधारात ठेवून ‘गोकुळ’चा पैसा ‘हलाल’साठी वापरणे ही लाखो शेतकऱ्यांची फसवणूकच आहे ! वर्ष २०१३ मध्ये चालू झालेली हलाल अर्थव्यवस्था आज जागतिक स्तरावर २.१ अमेरिकन ट्रिलियन डॉलर्सपर्यंत (१७९.६ लाख कोटी रुपये) पोचली आहे. हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘हलाल टॅक्स’ हा प्रत्यक्षात हिंदूंसाठी ‘जिझिया कर’च आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला खिळखिळी करणारी ‘हलाल अर्थव्यवस्था’ मोडून काढणे आवश्यक असून त्यासाठी भारत देश ‘हलाल’मुक्त झाला पाहिजे, *असे ठाम प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.*

 

ते कोल्हापूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रसंगी ‘हिंदू एकता आंदोलना’चे श्री. गजानन गुरव, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, ‘मराठा तितुका मेळवावा’चे श्री. योगेश केरकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव उपस्थित होते.

 

*या वेळी श्री. रमेश शिंदे म्हणाले की,* महाराष्ट्र राज्य हे देशातील ५ व्या क्रमांकाचे दूध उत्पादक राज्य आहे. राज्यात होणार्‍या एकूण उत्पन्नाच्या २.५ दशलक्ष लिटर दुधाची कमतरता आपल्याला असून अशा स्थितीत आपल्याला दूध निर्यात करण्याची आवश्यकताच काय ? जगातील १९२ देशांनी जर ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण’ (FSSAI) ला मान्यता दिली आहे, तर भारतात मात्र धर्मावर आधारीत ‘हलाल’ प्रमाणपत्राला आपण मान्यता का देतो ? ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण’ने जे एखाद्या पदार्थाच्या सर्व चाचण्या केल्यावर ‘यात मांसाशी संबंधित कोणतेही पदार्थ नाही’, असे सांगितले, तर त्यांच्यावर विश्वास न ठेवता आणखी एका ‘हलाल’ प्रमाणपत्राची आवश्यकता काय?

 

प्रारंभी केवळ ‘मांसापुरती’ मर्यादित असलेले ‘हलाल प्रमाणपत्र’ दूध, तुलसी अर्क, साखर, ‘डेटिंग ऍप’, निवासी संकुल, शेअर बाजार यांपासून आज बहुतांश प्रत्येक जीवनोपयोगी उत्पादन ‘हलाल प्रमाणित’ आहे. हिंदू घेत असलेली जवळपास प्रत्येक वस्तू ‘हलाल’असून हिंदूंच्या खिशातून जाणारा पैसा हा ‘हलाल’साठी खर्च केला जातो. ‘हलाल’मध्ये केवळ मुसलमानांच्या धार्मिकतेचा विचार केला असून यात हिंदूंसाठी पवित्र असलेली गोमातेच्या संदर्भातील कोणतेही उत्पादन वापरले जाणार नाही याची कोणतीही खात्री देत नाही, *असेही श्री. शिंदे यांनी या वेळी सांगितले.*

 

आपला नम्र,

*श्री. सुनील घनवट,*

राज्य संघटक, महाराष्ट्र व छत्तीसगड,

हिंदु जनजागृती समिती, (संपर्क : ७०२०३८३२६४)

संबंधित पोस्ट

खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शासन कटिबद्ध     – पालकमंत्री शंभूराज देसाई

महाराष्ट्राचे देशाच्या योगदानात मोठा वाटा : केंद्रीय शिक्षण सचिव संजय कुमार,नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा पुढचे पाऊल तर्फे सत्कार विविध योजनांच्या माध्यमातून मराठी टक्का वाढविण्याचा महाराष्ट्र शासनाचा भक्कम पाठिंबा..

महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टेट) परीक्षा: 23 नोव्हेंबरला

vishwatmaklokswamivarta

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांची युरोपियन युनियनचे परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरणाचे उच्च प्रतिनिधी / युरोपियन कमिशनचे उपाध्यक्ष काजा कलास यांच्यासोबत भेट

vishwatmaklokswamivarta

७७ वा प्रजासत्ताक दिन : राष्ट्रपती भवनातील ‘ॲट होम’ सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील चार मान्यवरांना विशेष निमंत्रण

vishwatmaklokswamivarta

विकसित भारताच्या स्वप्नांमध्ये विकसित महाराष्ट्राचे विशेष योगदान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मंत्रालयात 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वजारोहण