vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

विशेष लेख क्र.-महात्मा जोतीराव फुले द्वि जन्मशताब्दी वर्ष… सामाजिक समता, शिक्षण आणि प्रगतीचा नवा अध्याय

विशेष लेख क्र.-महात्मा जोतीराव फुले द्वि जन्मशताब्दी वर्ष… सामाजिक समता, शिक्षण आणि प्रगतीचा नवा अध्याय

    विशेष प्रतिनिधी- आधुनिक भारताचे अग्रगण्य समाजसुधारक, शिक्षणतज्ञ आणि मानवी मूल्यांचे खंदे पुरस्कर्ते महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दी वर्षाचे औसत्य साधून राज्यभरात विविध दिशादर्शक आणि प्रेरणादायी उपक्रमांची भव्य दिव्य अंमलबजावणी सुरू झाली आहे.

    समता, न्याय, शिक्षण आणि मानवाधिकार या मूल्यांवर आधारित महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी रोवलेली रोपे आज वटवृक्ष झाली असून, त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक सुवर्णयोग आहे.

     या ऐतिहासिक वर्षानिमित्त शासन स्तरावरून अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत विकासाचा प्रकाश पोहोचवण्यासाठी विविध विभागांच्या माध्यमातून अत्यंत नियोजनबद्ध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

     यामध्ये महात्मा फुले समता शिध्याच्या माध्यमातून राज्यातील कोट्यवधी गरजू कुटुंबांना सवलतीच्या दरात जीवनावश्यक वस्तूंचा संच उपलब्ध करून देण्यात येत आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होत आहे.

     तसेच, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक न्यायाला बळ देण्यासाठी अल्पसंख्याक विकास, इतर मागास बहुजन कल्याण, सामाजिक न्याय, आणि महिला व बालविकास विभागांमार्फत विशेष अनुदान योजना, चरित्रग्रंथांचे प्रकाशन, लघुकथा आणि स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच समता आणि राष्ट्रभक्ती रुजवण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘महात्मा फुले शैक्षणिक प्रेरणा सप्ताह’ साजरा केला जात असून, विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे.

ग्रामीण भागाचा विकास आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महसूल लोकअदालत अभियानासोबतच जलसंवर्धन आणि शाश्वत शेतीचे उपक्रम राबवले जात आहेत.

     सातारा येथील नायगाव, कटगुण तसेच पुणे येथील खानवडी या महापुरुषांच्या पवित्र जन्मभूमी व कर्मभूमी स्थळांचा विकास करून नवीन पिढीला प्रेरणादायी अभ्यास भेटी घडवून आणल्या जात आहेत. कौशल्य विकास आणि तंत्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचे मोठे काम याद्वारे होत आहे.

     महात्मा फुले यांचे विचार म्हणजे केवळ इतिहास नव्हे तर तो वर्तमानाचा दीपस्तंभ आणि भविष्याचा मार्ग आहे. या द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त सर्व शाळा, महाविद्यालयीन तरुण-तरुणी, अधिकारी आणि नागरिकांनी या अभियानात उत्साहाने सहभागी होऊन महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वसा आणि वारसा अखंड पुढे चालवूया, हाच या सर्व उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.

 

मनोज सुमन शिवाजी सानप,जिल्हा माहिती अधिकारी रायगड-अलिबाग

0000

 

संबंधित पोस्ट

मसकऱ्या गणेशोत्सव नागपूरची वैभवशाली सांस्कृतिक ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी घेतले मसकऱ्या गणपतीचे दर्शन

श्री सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण प्रकल्पामुळे परिसराला मिळणार नवे रूप – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री सिद्धिविनायक मंदिर परिसर सुशोभीकरणाचे भूमिपूजन

मच्छिमार आणि महिला कामगारांसाठी विश्रामगृह तातडीने खुले करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश ससून डॉक बाबत घेतली आढावा बैठक

एक महिन्यात मराठी शिकण्याची संधी, अन्यथा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित – मंत्री प्रताप सरनाईक व्यावहारिक मराठी येत नसलेल्या १ हजार २६८ चालकांना नोटीस ३० सप्टेंबरपर्यंत राज्यभर तपासणी मोहीम

परभणी जिल्ह्याच्या विकासाला गती; विविध योजनांतून जिल्ह्याचा सर्वांगीण बदल – पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

जिल्हा रुग्णालयातील जळीत रुग्ण कक्षाचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते लोकार्पण