vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

एक महिन्यात मराठी शिकण्याची संधी, अन्यथा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित – मंत्री प्रताप सरनाईक व्यावहारिक मराठी येत नसलेल्या १ हजार २६८ चालकांना नोटीस ३० सप्टेंबरपर्यंत राज्यभर तपासणी मोहीम

एक महिन्यात मराठी शिकण्याची संधी, अन्यथा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित – मंत्री प्रताप सरनाईक,व्यावहारिक मराठी येत नसलेल्या १ हजार २६८ चालकांना नोटीस ३० सप्टेंबरपर्यंत राज्यभर तपासणी मोहीम…

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी व्यावहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यभर तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. ज्या चालकांना व्यावहारिक मराठीचे ज्ञान नसल्याचे तपासणीत आढळेल, त्यांना नोटीस बजावून एक महिन्याच्या कालावधीत मराठी भाषा शिकणे बंधनकारक करण्यात येत आहे. या मुदतीत मराठी भाषेचे ज्ञान आत्मसात न केल्यास संबंधित चालकाचा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

मुंबई महानगर क्षेत्रात झालेल्या तपासणीत ३ हजार ९९५ वाहनचालकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६०४ चालकांना व्यवहारिक मराठीचे पुरेसे ज्ञान नसल्याचे आढळून आले असून, या सर्वांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. राज्यातील उर्वरित आकडेवारीनुसार आतापर्यंत ४ हजार २२२ चालकांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ६६४ चालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.

“महाराष्ट्रात व्यवसाय करून प्रवाशांशी थेट संवाद साधणाऱ्या व्यावसायिक वाहनचालकांना व्यवहारिक मराठी येणे ही केवळ नियमांची बाब नाही, तर प्रवाशांच्या सोयी-सुरक्षेशी संबंधित बाब आहे. चालकांना मराठी शिकण्यासाठी पुरेसा कालावधी दिला जात आहे. मात्र, दिलेल्या मुदतीनंतरही नियमाचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल,” असे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

ही तपासणी मोहीम ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. तपासणीदरम्यान चालकांना व्यवहारिक मराठीचे ज्ञान तपासले जाईल. मराठीचे ज्ञान नसलेल्या चालकांना सुधारणा करण्याची संधी देण्यात येणार असली, तरी त्यानंतरही नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात विहित मुदतीनंतर बॅज निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे.

 

०००

संबंधित पोस्ट

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने लेख ……गुरुपौर्णिमेचे महत्त्व ‘गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्‍वरः । गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥

जिल्हा ‘हरित ऊर्जा’ युक्त करण्यासाठ,विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी

vishwatmaklokswamivarta

जिल्हाभरात शाळा प्रवेशोत्सवाचा जल्लोष. जिल्हाभरात 682 अधिकारी, 288 लोकप्रतिनिधींनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत. पहिल्या दिवशी जिल्हाभरात 16 हजार 647 मुले शाळेत दाखल. जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी 

जिल्ह्यात 28 जून रोजी शिक्षक पात्रता (MAHA-TET) परीक्षा

शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्या एजंटांवर प्रतिबंधात्मक कारवाई-उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी जारी केले आदेश …

vishwatmaklokswamivarta

SIR अंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; 1.91 लाख कायमस्वरूपी स्थलांतरित, 88 हजार 490 मृत मतदारांची नोंद

vishwatmaklokswamivarta