vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

ठाण्यातील काही भागात गुरूवारपासून पाणी नाही

ठाण्यातील काही भागात गुरूवारपासून पाणी नाही

ठाणे प्रतिनिधी) : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभाग समिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा मार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. यावर्षी पावसाळ्यानंतरचा कमी पाऊस व अलनिनो प्रभाव आणि ऑक्टोंबर 2026 पासून मान्सू ने लवकर माघार घेतल्यामु‌ळे शासन निर्णयाप्रमाणे 10 टक्के पाणी कपात करण्याचे ठरले आहे. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे जांभूळ जलशुध्दीकरण केंद्र येथून होणारा पाणी पुरवठा गुरुवार दि. 22/10/2026 रोजी रात्री 12.00 वाजेपासून ते शनिवार दि. 24/10/2026 रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यंत एकूण 36 तास पाणी पुरवठा बंद राहील.

सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिके अंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31 चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समिती मधील सर्व भागामध्ये, व वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा 36 तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरु झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी.

सदर पाणी कपातीच्या कालावधीत नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

0000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी जालना जिल्ह्यात प्रशासनाची तयारी सुरूमतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश;  निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

अमृतच्या लक्षित गटाचे परिवार सर्वेक्षण सुरू

ओबीसी आश्रमशाळांमधून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्या – मंत्री अतुल सावे

vishwatmaklokswamivarta

दर्पणकारांचे पत्रकारितेतील योगदान आणि आजच्या पत्रकारांची नैतिक जबाबदारी

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम प्रवाश्यांच्या समस्या व तक्रार निराकरणासाठी प्रवासी राजा व कामगार पालक दिनाचे आयोजन