vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता

जिल्ह्यात दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता

नांदेड प्रतिनिधी :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 08 मे 2026 रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 08 व 09 मे 2026 या दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

या गोष्टी करा :विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा

या गोष्टी करु नका: आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

00000

संबंधित पोस्ट

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 120 उमेदवारांची प्राथमिक निवड  

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या भित्तिपत्रकाचे अनावरण

राष्ट्रध्वजाच्या योग्य वापराबाबत आवाहन

दिव्यांग आनंद मेळा’चे आयोज: २८ फेब्रुवारीपर्यंत मेळा राहणार सुरू

vishwatmaklokswamivarta

शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांची निवडयादी प्रसिद्ध

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन