vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

बेघर निवारा केंद्राला भेट देत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचा बेघरांशी संवाद

बेघर निवारा केंद्राला भेट देत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचा बेघरांशी संवाद

        नवी मुंबई प्रतिनिधी-  नवी मुंबई महानगरपालिका संचालित घणसोली येथील बेघर निवारा केंद्रास आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी भेट देत तेथील व्यवस्थेची पाहणी केली आणि तेथे असलेल्या बेघर स्त्री, पुरूष नागरिकांशी संवाद साधत उपलब्ध सुविधांमध्ये वाढ करण्याचे निर्देश दिले.

याप्रसंगी आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, अतिरिक्त शहर अभियंता श्री.अरविंद शिंदे, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.सोमनाथ पोटरे, घनकचरा व्यवस्थापन विभाग उपआयुक्त डॉ.अजय गडदे, उद्यान विभाग उपआयुक्त श्रीम. स्मिता काळे व इतर अधिकारी उपस्थित होते.

 यावेळी आयुक्तांनी महिला व पुरूष कक्षामधील बेघर नागरिकांशी संवाद साधत त्यांची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या खानपान व्यवस्थेचीही पाहणी केली तसेच त्यांची आरोग्य तपासणी वेळेच्या वेळी केली जात असल्याबद्दल माहिती घेतली.

  याठिकाणी असलेल्या बेघर व्यक्तींना त्यांच्या आवडीनुसार विविध कलागुण जोपासण्याच्या दृष्टीने शिलाईकाम तसेच कलाकुसरीच्या कामाची संधी उपलब्ध करून द्यावी तसेच वाचण्यासाठी पुस्तकांची सुविधा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. निवारा केंद्राच्या दर्शनी भागात पावसाळ्यापूर्वी शेड तयार करून घ्यावा तसेच बसण्यासाठी बेंच उपलब्ध करून द्यावेत अशाही सूचना त्यांनी केल्या. बेघरांची संख्या लक्षात घेऊन आणखी केंद्र सुरू करणेबाबत तपासणी करावी अशाही सूचना आयुक्तांनी यावेळी केल्या.

00000

संबंधित पोस्ट

विश्वास नांगरे पाटील यांनी छावा चित्रपटावर ही प्रतिक्रिया दिली आहे जी सोशल मीडियावर व्हायरल

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनगौरवाचा अनुभव देण्याऱ्या भारत गौरव पर्यटन रेल्वेगाडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून हिरवा झेंडा दाखवला. 

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीत ५ ते ८ मार्चदरम्यान महिला कला महोत्सव २०२६

दुध भेसळ प्रकरणी गाय दुधाचा 10 लाख 63 हजार किंमतीचा साठा नष्ट- सहाय्यक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे

महाराष्ट्र हे देशाचे वित्तीय इंजिन असून, राज्याचा समावेशक व प्रगतीशील विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. तंत्रज्ञान, नवोपक्रम आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीच्या समन्वयातून महाराष्ट्र अधिक समृद्ध होणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

नांदेड विधान परिषद द्विवार्षिक निवडणुकीसाठी 8 उमेदवारांचे 17 नामनिर्देशन अर्ज दाखल