
नांदेड विधान परिषद द्विवार्षिक निवडणुकीसाठी 8 उमेदवारांचे 17 नामनिर्देशन अर्ज दाखल
नांदेड, प्रतिनिधी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. 27 मे ते 1 जून दरम्यान एकूण 8 उमेदवारांनी 17 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत.
दाखल झालेल्या अर्जांमध्ये :
कृष्णा नागेश पाटील (अपक्ष) – 4 अर्जप्रविण प्रतापराव चिखलीकर (नॅशनॅलीस्ट काँग्रेस पार्टी/अपक्ष) – 2 अर्जअमरनाथ अनंतराव राजूरकर (भाजप) – 4 अर्जज्योतिबा जयरामजी खराटे (अपक्ष) – 3 अर्जपवार माधवराव निवृत्तीराव (अपक्ष) – 1 अर्जरामदास शिवराज पाटील (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) – 1 अर्जपंकज माणिकराव गायकवाड (अपक्ष) – 1 अर्जप्रशांत विराज इंगोले (अपक्ष) – 1 अर्ज
भाजपचे अमरनाथ राजूरकर आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रामदास पाटील यांनी पक्षाचा अधिकृत AA-BB फॉर्म सादर केला आहे.नामनिर्देशन अर्जांची छाननी 2 जून रोजी होणार असून, अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 जून 2026 आहे. मतदान 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत होईल, तर मतमोजणी 22 जून 2026 रोजी करण्यात येणार आहे. या निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील 452 पात्र मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
0000
00000



