vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

धक्कादायक: न्यायासाठी महिलेचे आमरण उपोषण!गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून जीवितास धोका; प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची महिलेची मागणी..

धक्कादायक: न्यायासाठी महिलेचे आमरण उपोषण!गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून जीवितास धोका; प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची महिलेची मागणी…

जालना (प्रतिनिधी) : जालना येथील रहिवासी सौ. जयश्री संजय कटके यांनी आपल्या मालकी हक्काच्या जमिनीच्या न्यायासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. संबंधित जमिनीचे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असतानाही काही गुंड प्रवृत्तीचे लोक दहशत निर्माण करत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे.माध्यमांशी बोलताना सौ. कटके यांनी सांगितले की, त्यांनी रीतसर खरेदीखत केलेल्या जमिनीवर काही लोकांनी जाणीवपूर्वक वाद निर्माण केला आहे. या वादातून गुंड प्रवृत्तीचे लोक वारंवार जागेवर येऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आणि तहसील कार्यालयाकडे वारंवार निवेदने देऊनही अद्याप प्रशासनाने कोणतीही ठोस दखल घेतलेली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. संबंधित लोकं आपल्याला कोणत्याही क्षणी जाळून टाकू अशी धमकी देत आहेत. आमच्यावर हल्ला होण्याची भीती 24 तास मनात आहे, असा गंभीर आरोप करत सौ. कटके यांनी पोलीस प्रशासनाकडे संरक्षणाची मागणी केली आहे. या त्रासामुळे आपण पूर्णपणे हतबल झाल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे प्रशासनाने या प्रकरणावर गांभीर्याने लक्ष द्यावे, आपण प्रचंड दहशतीमध्ये असून सततच्या धमक्यांमुळे हतबल झाले असून जोपर्यंत न्यायालयाचा अंतिम निकाल लागत नाही, तोपर्यंत शासनाने सदर जागा आपल्या ताब्यात घेतली तरी हरकत नाही, गुंड प्रवृत्तीच्या सुनील राठी, अनिल मालपाणी यांच्या सह अन्य लोकांपासून जीविताला धोका असल्याने तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे,अशी मागणी उपोषणकर्त्या सौ. जयश्री संजय कटके यांनी केली आहे

प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही सुरू असलेल्या या दहशतीमुळे जालन्यात चर्चेला उधाण आले असून, आता प्रशासन या उपोषणाची दखल घेऊन काय पाऊले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सदरील जागा न्यायप्रविष्ठ असल्यामुळे या जागेचा ताबा सरकारने घ्यावा त्या जागेवर कुणालाही ताबा करू देऊ नये अशी मागणी देखील त्यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चितळे बंधू व्हिजन पार्कचे उद्घाटन-निर्यात केंद्रीत खाद्यउद्योगासाठी शासन सहकार्य करेल -मुख्यमंत्री

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024ची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध-

ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा 48 तास बंद

ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी आनंदाची संधी!राजर्षी शाहू महाराज मानधन सन्मान योजना २०२५-२६-३१ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

कार्तिकी एकादशीच्या शुभदिनी पंढरपुरातील विठ्ठलाच्या मंदिरात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवार सहकुटुंब शासकीय महापूजा संपन्न बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल करावा विठ्ठल, जीवभाव…

vishwatmaklokswamivarta

हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या अमृतमहोत्सवानिमित्त दोन दिवसीय रिजनल कन्व्हेंशन· पर्यटन क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा..

vishwatmaklokswamivarta