vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिवनगर येथे स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर; १५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभागरक्तदान हेच जीवनदानचा संदेश; सेवा व समर्पणातून मानवतेचा जागर

शिवनगर येथे स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर; १५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभागरक्तदान हेच जीवनदानचा संदेश; सेवा व समर्पणातून मानवतेचा जागर

जालना (प्रतिनिधी) : जालना शहरातील शिवनगर परिसरात असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराज केंद्रामध्ये आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, एकूण १५ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी सिद्ध केली. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी स्वामींच्या शिकवणीप्रमाणे सेवा आणि परोपकार यांचे महत्त्व अधोरेखित केले. सेवा हीच खरी पूजा या भावनेतून अनेकांनी रक्तदानात सहभाग घेतला.

शिबिरात वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली रक्तसंकलन प्रक्रिया पार पडली. प्रत्येक रक्तदात्याची आरोग्य तपासणी करून सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्यात आली. विशेष म्हणजे या उपक्रमात तरुणाईचा लक्षणीय सहभाग दिसून आला. अनेक युवकांनी प्रथमच रक्तदान करत समाजासाठी योगदान दिले. रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार असून, या उपक्रमाने समाजात सकारात्मक संदेश पोहोचवला आहे. आयोजकांनी सर्व रक्तदाते, स्वयंसेवक व वैद्यकीय पथकाचे मनःपूर्वक आभार मानले. स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित या रक्तदान शिबिराने सेवा, समर्पण आणि मानवतेचा संदेश देत जालना शहरात एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले.

00000

संबंधित पोस्ट

दप्तर हलके करण्याच्या नावाखाली शिक्षण विभागाने केल्या कोटींच्या चुका !पुस्तकात वह्यांची पाने घालण्याच्या प्रयोगात शासनाचे१३५ कोटी वाया; सुराज्य अभियानाकडून चौकशीची मागणी…

शासनाच्या भरती प्रक्रियेत सुधारणा;संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने १८ सेवांचा, ९३ संवर्गाचा समावेश…

जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा

हिवाळी अधिवेशन २०२५ दूरध्वनी पुस्तिके’चे प्रकाशन माहिती विभागाचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते 

vishwatmaklokswamivarta

कैलास गोरंटयाल यांच्या वाढदिवसा निमित्त बुधवारी कुस्त्यांची भव्य दंगल लाखो रुपयांच्या बक्षिसांची होणार लयलूट …

वेव्हज् 2025′ अंतर्गत ‘वंडरमेंट – ए.आर. रहमान लाईव्ह इन कॉन्सर्ट’ सांगीतिक कार्यक्रमानंतर डॉ. डी वाय पाटील स्टेडियम परिसरात रात्रीच विशेष स्वच्छता मोहीम,रस्त्यावरून 2 टन व स्टेडियम परिसरातून 5.5 टन कचरा संकलन