vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी माण तालुक्यातील विविध शाळांना दिल्या* *भेटी* 

जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी माण तालुक्यातील विविध शाळांना दिल्या* *भेटी*

 

सातारा प्रतिनिधी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी मान तालुक्यातील विविध परिषदेच्या शाळांना भेटी देऊन शाळेमार्फत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेतली.

सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माण तालुक्यात आकस्मिक भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, तहसीलदार विकास अहिर, सहाय्यक गटविकास अधिकारी चंद्रकांत खाडे, पोलीस निरीक्षक दराडे गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, विस्तार अधिकारी नंदकुमार दंडिले,केंद्रप्रमुख महादेव कदम उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी माण तालुक्यातील कासारवाडी, मलवडी, आंधळी या विविध शाळांना आकस्मिक भेटी दिल्या. या भेटीदरम्यान जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी माण तालुक्यामध्ये नव्याने सुरू असलेला व्हिलेज गोज टू स्कूल इंग्रजी विषय उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. कासारवाडी या गावी व्हिलेज गोज टू स्कूल या शैक्षणिक उपक्रमाचे श्री. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी कासारवाडी शाळेमधील विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्याशी सुसंवाद साधला. तसेच उपक्रमाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. दुर्गम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे इंग्रजी संभाषण कौशल्य व तयारी पाहून सर्वांना शाबासकीची थाप हे जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिली.

 आंधळी व मलवडी शाळेमध्ये सुरू असलेले BALA(Building As a Learning Aid) बाला पेंटिंग व मुलांचे संगणक ज्ञान, प्रात्यक्षिकची माहिती घेत बालचमुंचे मनोबल वाढवले. मलवडी शाळेतील मुख्याध्यापक प्रशांत जाधव यांनी स्वतः इंग्रजी मधून या उपक्रमाचे विवेचन केले.

 इयत्ता दहावी परीक्षा सुरू आहे या अनुषंगाने जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी त्रिंबकराव काळे विद्यालय मलवडी येथे भेट देऊन परीक्षा केंद्रावरील पाहणी केली.

00000

संबंधित पोस्ट

सांगली जिल्ह्यात 4 कोटी 80 लाखांचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा- सद्यस्थितीत एक टँकर, 7 विहिरींद्वारे पाणीपुरवठा – मागणी व आवश्यकतेनुसार नियोजन 

नागरिकांच्या तक्रारी, सार्वजनिक समस्यांच्या जलद निराकरणासाठी प्रसिद्धी माध्यमांची होणार मदत – माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांची माहिती

पतसंस्थांच्या प्रगतीसाठी आवश्यक कायदेशीर सुधारणा लवकरच – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

पुसेगांव शासकीय विद्यानिकेतनला ११ लाखांचे पारितोषिक*

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यास्पर्धा परीक्षा-2026 चे वेळापत्रक संकेत स्थळावर उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

दक्षता जनजागृती सप्ताहाला भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथेने सुरवात…

vishwatmaklokswamivarta