vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नागरिकांच्या तक्रारी, सार्वजनिक समस्यांच्या जलद निराकरणासाठी प्रसिद्धी माध्यमांची होणार मदत – माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांची माहिती

नागरिकांच्या तक्रारी, सार्वजनिक समस्यांच्या जलद निराकरणासाठी प्रसिद्धी माध्यमांची होणार मदत – माहिती व जनसंपर्क प्रधान सचिव ब्रिजेश सिंह यांची माहिती…

 

[माध्यमांमधील शासनविषयक बातम्यांची त्वरित दखल घेतली जाणार]

 

मुंबई, प्रतिनिधी : नागरिकांच्या तक्रारी आणि सार्वजनिक समस्यांविषयी विविध माध्यमांमधून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांना त्वरित प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने आज महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकाद्वारे विविध माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या शासनविषयीच्या महत्त्वपूर्ण बातम्यांची दखल घेऊन त्याद्वारे शासनाची कार्यक्षमता वाढवून नागरिकांना अधिक चांगल्या सेवा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव आणि महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी दिली.

प्रमुख वैशिष्ट्ये आणि उद्दिष्टे:माध्यमांमधून प्रसिद्ध होणाऱ्या विविध बातम्यांची शासकीय विभागांकडून तात्काळ दखल घेण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांच्या तक्रारी, समस्यांच्या निराकरणासाठी मदत होणार आहे. कार्यक्षम सेवा, वितरण यंत्रणा, समस्यांचे जलद निराकरण करणे याकरिता माध्यमांमधून प्रसिद्ध होणारी माहिती तथा बातम्यांची महत्त्वपूर्ण मदत घेता येणार आहे.

परिपत्रकाचा प्रमुख उद्देश.* माध्यमांशी संवाद वाढविणे* नागरिक-शासन दुवा मजबूत करणे* पारदर्शक संवाद प्रक्रिया राबविणे* नियमित माहितीची देवाण-घेवाण करणे

कार्यपद्धती* प्रत्येक विभागात नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती* बातम्यांची त्वरित दखल* साप्ताहिक कृती अहवाल* मासिक पुनर्विलोकन बैठका

अपेक्षित परिणाम:* बातम्यांची त्वरित दखल घेऊन जलद तक्रार निवारण* नागरिकांच्या समाधानात वाढ* प्रशासकीय कार्यक्षमता वृद्धी* सुशासन, प्रतिमा बळकटीकरणमाध्यमांमधील माहितीची त्वरित दखल“हे परिपत्रक म्हणजे पारदर्शक आणि जबाबदार प्रशासनाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे माध्यमांमधून प्रसिद्ध होणारी माहिती आणि बातम्यांची दखल घेऊन त्याद्वारे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अधिक प्रभावी यंत्रणा कार्यान्वित होईल, असे श्री. सिंह यांनी सांगितले.

0000000

संबंधित पोस्ट

वसई येथील घटना: चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या घाईत तरुणाचा निसटला पाय, आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण,

प्राथमिक शिक्षण विभागाचे स्थलांतर वागळे इस्टेट येथील कार्यालयात; स्वच्छ भारत मिशन व कृषी विभाग बी. जे. हायस्कूल येथे स्थलांतर….

vishwatmaklokswamivarta

मुंबईत शालेय शिक्षणमंत्र्यांची धारावीतील शाळांना भेट; गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देण्यात शिक्षकांची जबाबदारी मोठी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

vishwatmaklokswamivarta

गृहराज्यमंत्र्यांचे आदेश – नवाजुद्दीन सिद्दीकी व ‘बिग कॅश’वर कारवाई होणार! पोलिसांच्या गणवेशाचा अवमान करणारी दिशाभूल करणारी जाहिरात हटवली; पण दोषींवर कारवाई कधी? – सुराज्य अभियान

धनगर समाज आरक्षण मोर्चानिमित्त वाहतूक मार्गात बदल ..

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न  श्री के कामराज यांच्या 120 व्या जयंती निमित्ताने मुंबईतील धारावी विभागात गोरगरीब शालेय विद्यार्थ्यांसाठी भारतीय जनता पार्टी दक्षिण-मध्य मुंबई आणि अथर्व फाउंडेशन यांच्या वतीने मोफत वहया वाटप

vishwatmaklokswamivarta