
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने व्याख्यानांतून गुरु-शिष्य परंपरेविषयी प्रबोधन-मुंबईतील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई प्रतिनिधी– ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा’मध्ये भारतीय ज्ञानपरंपरेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने महर्षि अध्यात्म विश्व विद्यालयाच्या ‘भारतीय ज्ञान प्रणाली प्रसार शृंखले’च्या (इंडियन नॉलेज सिस्टम्स अर्थात् आय.के.एस्.च्या) ‘गुरु-शिष्य परंपरा : आधुनिक शिक्षणासाठी प्राचीन प्रणाली’ या विषयावर महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने मुंबईतील विविध महाविद्यालयांत गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित अभ्यासपूर्ण व्याख्यानांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मुंबईतील के.जे.सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स-कॉमर्स, नेशनल कॉलेज, थडोमल शाहानी इंजिनियरिंग कॉलेज, एन.के.ई.एस.कॉलेज, महर्षि दयानंद कॉलेज या महाविद्यालयात ही व्याख्याने घेण्यात आली. या व्याख्यानांचा शेकडो विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
गुरुकुल शिक्षण पद्धतीमुळे कुटुंब आणि समाजव्यवस्था टिकून !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या डॉ.(प्रा.) (सौ.) सायली यादव व्याख्यानांत गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व संबोधित करताना म्हणाल्या ‘प्राचीन भारतात गुरुकुल शिक्षणपद्धतीत शिष्यांना विविध विद्या, कला आणि जीवनकौशल्ये शिकवली जात असत; मात्र त्या सर्वांचा केंद्रबिंदू आध्यात्मिक उन्नती हा होता. त्यामुळे व्यक्ती, कुटुंब आणि समाज यांच्यात संतुलन टिकून राहत असे. आजही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासह भावनिक आणि आध्यात्मिक विकासावर भर दिल्यास तणावमुक्त, सुसंस्कृत आणि जबाबदार पिढी घडवणे शक्य आहे’.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकड़ून या वर्षी महाविद्यालयांमध्ये व्याख्यानांचा उपक्रम चालू असताना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुपरंपरेला वंदन करण्यासाठी मुंबई विद्यापिठाचा ‘सेंटर ऑफ हिंदु स्टडीज्’, ‘बोर्ड ऑफ स्टडीज् इन इंडियन नॉलेज सिस्टम’ आणि ‘पुरातत्त्व विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारतीय ज्ञान परंपरा’ या विषयावर गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्पर्धाही आयोजित करण्यात आली, असे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकड़ून प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.श्री. शॉन क्लार्क,संशोधन प्रमुख आणि प्राध्यापकमहर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाकरिता



