vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गणेश विर्सजनाचे मिरवणूकीमध्ये डॉल्बी/डीजे साऊंड सिस्टीम, तीव्र क्षमतेचे लेझर बीम लाईटस्,स्नो स्प्रे आणि केमिकल स्प्रे यांचा वापर करण्यास प्रतिबंधात्मक अधिसूचना जारी…

गणेश विर्सजनाचे मिरवणूकीमध्ये डॉल्बी/डीजे साऊंड सिस्टीम, तीव्र क्षमतेचे लेझर बीम लाईटस्,स्नो स्प्रे आणि केमिकल स्प्रे यांचा वापर करण्यास प्रतिबंधात्मक अधिसूचना जारी…

रायगड-अलिबाग प्रतिनिधी: रायगड जिल्हयामध्ये गणेशोत्सव विसर्जन मिरवणूका शांततामय वातावरणात पार पाडल्या जाव्यात, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये तसेच मिरवणूकांमध्ये नागरीकांच्या व मिरवणूकीकरीता नेमण्यात आलेल्या अधिकारी/कर्मचारी यांचे डोळयांच्या सुरक्षेसाठी लेझर लाईटचा वापर कटाक्षाने टाळणे आवश्यक आहे. यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता-२०२३ चे कलम १६३ अन्वये रायगड जिल्हयात पोलीस अधीक्षक कार्यक्षेत्रामध्ये गणेशोत्सव जन मिरवणूका शांततेत पार पाडाव्यात आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून तसेच नागरीकांच्या आरोग्याचे दृष्टीने दि.१९ सप्टेंबर २०२६ व दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी श्री गणेश विर्सजनाचे मिरवणूकीमध्ये डॉल्बी/डीजे साऊंड सिस्टीम, तीव्र क्षमतेचे लेझर बीम लाईटस्, स्नो स्प्रे आणि केमिकल स्प्रे यांचा वापर करण्यास जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी प्रतिबंधात्मक अधिसूचना जारी केली आहे.

राज्यात सर्वत्र गणेशोत्सव साजरा होणार असून दि. १९/०९/२०२६ (सहावा दिवस), दि.२५/०९/२०२६ (अनंत चर्तुदशी) या दिवशी श्री गणेशाचे विर्सजन होणार आहे. श्री गणेशाचे आगमन तसेच विर्सजनावेळी मिरवणूकीमध्ये ठिकठिकाणी डॉल्बी साऊंड सिस्टीम/ स्नो स्प्रे, हिट स्प्रे/ लेझर बीम लाईटसचा वापर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाव्दारे केला जातो. श्री गणेश विसर्जन मिरवणूकीत ध्वनीक्षेपकांच्या दणदणाटामुळे काही नागरीकांना बहिरेपणाची समस्या तसेच काहींना हृदय विकाराचे झटके आल्याच्याही घटना घडल्या आहेत. तसेच श्री गणेश विर्सजन मिरवणूकीत लेझर लाईटमुळे डोळ्यांना इजा झाल्याचे प्रकार घडले आहेत. लेझर बीम लाईटमुळे नागरीकांचे तसेच मिरवणूक बंदोबस्ताकरीता नेमण्यात आलेल्या अधिकारी/अंमलदारांचे आरोग्याचे प्रश्न उपस्थित झाल्याचे निदर्शनास आले आहे.

या आदेशाचा भंग करुन गणपती विर्सजनाचे मिरवणूकीमध्ये डॉल्बी/डीजे साऊंड सिस्टीम, तीव्र क्षमतेचे लेझर बीम लाईटस्, स्नो स्प्रे आणि केमिकल स्प्रे यांचा वापर करताना आढळून आल्यास अशी व्यक्ती/संस्था/मंडळ/संचालक हे भारतीय न्याय संहितेचे कलम २२३ प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहतील.

 

००००००

संबंधित पोस्ट

अमरावती आयटीआयमध्ये सोमवारी शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

एक महिन्यात मराठी शिकण्याची संधी, अन्यथा बॅज तीन महिन्यांसाठी निलंबित – मंत्री प्रताप सरनाईक व्यावहारिक मराठी येत नसलेल्या १ हजार २६८ चालकांना नोटीस ३० सप्टेंबरपर्यंत राज्यभर तपासणी मोहीम

पावसाळ्यात झाडे पडणे ही केवळ नैसर्गिक घटना नाही; ती मानवनिर्मित आपत्ती !  सुराज्य अभियान,झाडांच्या मुळांची गळचेपी करून नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर ‘सदोष मनुष्यवधा’चा गुन्हा दाखल करा !

शाळांच्या परिसरात अपायकारक अन्नपदार्थ व कॅफिनयुक्त पेयांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई – मंत्री नरहरी झिरवाळ

नरनाळा महोत्सवात रंगणार भव्य कवीसंमेलन

स्वाधार योजनेतील अर्जातील त्रुटी दुरुस्तीसाठी 4 मेपर्यंत मुदत..