vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

दिव्यांग उमेदवारांसाठी विशेष करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

दिव्यांग उमेदवारांसाठी विशेष करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन

जालना, प्रतिनिधी:- जिल्ह्यातील नोकरीच्या शोधात असलेल्या दिव्यांग युवक-युवतींसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयांतर्गत असलेल्या ‘नॅशनल करिअर सर्विस सेंटर’ (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 6 मार्च 2026 रोजी विशेष पुनर्वसन व करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शिवाजी पुतळा परिसरातील गुरुगणेश सभा मंडप, श्रावक संघ तपोधाम येथे हे शिबिर पार पडणार असून जास्तीत जास्त दिव्यांगांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

या शिबिरात सहभागी होणाऱ्या उमेदवारांना केवळ मार्गदर्शनच मिळणार नाही, तर प्रत्यक्ष रोजगाराच्या संधींशी जोडले जाण्यासाठी मदत केली जाणार आहे. उमेदवारांच्या क्षमतेनुसार त्यांना कोणत्या क्षेत्रात करिअर करता येईल, याचे मार्गदर्शन तज्ज्ञांमार्फत केले जाईल. ‘RPWD Act 2016’ नुसार पात्र दिव्यांगांना केंद्रातर्फे ओळखपत्र दिले जाईल. तसेच भारत सरकारच्या ‘नॅशनल करिअर सर्विस’ पोर्टलवर नोंदणी करून दिली जाईल. विविध खासगी कंपन्या आणि उद्योगांमधील संधींची माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. अधिक माहितीसाठी मॉडेल करिअर सेंटर, जालनाचे समन्वयक डॉ. अमोल परिहार (९८२२८५८५७४) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या विविध विभागांना सतर्कतेच्या सूचना…

जालना गणेश फेस्टीवलमध्ये मान्यवरांच्या हस्ते सभा मंडप पूजन-अशोकराव आगलावे

गडचिरोलीतून 100 कोटींच्या निर्यातीसाठी उद्योजकांनी पुढाकार घ्यावा – जिल्हाधिकारी अविश्यंत पंडा**महानिर्यात-इग्नाईट कन्व्हेन्शन 2026 एक दिवसीय परिषद संपन्न*

vishwatmaklokswamivarta

आश्रमशाळेतील प्रश्नांवर आदिवासी मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा,आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने मंत्री, सचिव, आयुक्तांसोबत सहविचार सभा…

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५मुख्य निवडणूक निरीक्षक जगदीश मिनीयार यांनी घेतला महानगरपालिका निवडणुकीचा आढावा -जिल्हाधिकारी तथा महापालिका आयुक्त आशिमा मित्तल यांनी दिली आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी संदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती • आचारसंहिता, स्ट्राँग रूम आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत नोडल अधिकाऱ्यांशी साधला संवादमतदान प्रक्रिया निर्भय व शांततेत पार पाडण्यासाठी संवेदनशील मतदान केंद्रावर विशेष लक्ष ठेवा- मुख्य निवडणूक निरीक्षक जगदीश मिनीयार 

दावा न केलेली रक्कम खातेदारांना देण्यासाठी बँकांनी जनजागृती करावी- जिल्हाधिकारी अशोक काकडे- दावा न केलेली रक्कम खातेदारांना परत देण्यासाठी महामेळावा संपन्न- ⁠आतापर्यंत ३३४ खातेदारांना ३९ लाखांचा लाभ..

vishwatmaklokswamivarta