vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत ठाणे जिल्हा परिषदेत डाटा एन्ट्री ऑपरेटरची भरती

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत ठाणे जिल्हा परिषदेत डाटा एन्ट्री ऑपरेटरची भरती

       ठाणे प्रतिनिधी-  प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत ठाणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटरच्या पाच रिक्त पदांची भरती करण्यात येत असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

  अर्ज स्वीकारण्याचा अंतिम आज, दि. २४ सप्टेंबर, २०२५ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत असून, इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज जिल्हा परिषद ठाणे मुख्यालय येथे स्वतः सक्षम पद्धतीने किंवा टपालाद्वारे जमा करावा. अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती पडताळणीसाठी सादर करणे आवश्यक आहे.

    या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना रु. २५,०००/- प्रतिमाह मानधन देण्यात येईल. शैक्षणिक अर्हता व इतर अटी जाहिरातीत स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत.

  भरतीसंदर्भातील जाहिरात व अर्जाचा नमुना जिल्हा परिषद ठाणेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://zpthane.maharashtra.gov.in उपलब्ध करून देण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज दाखल करून या संधीचा लाभ घ्यावा, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी आवाहन केले आहे.

000

संबंधित पोस्ट

राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा येथेशिकाऊ उमेदवारांची भरतीØ पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी खातेदारांना आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंतिम मुदत दि.28 फेब्रुवारी

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण प्रगतीसाठी बँकांची भूमिका महत्त्वाची – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**बँक ऑफ इंडिया, आष्टी शाखेचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन*

vishwatmaklokswamivarta

वैदिक मिलेट्स: पारंपरिक धान्याला आधुनिक आरोग्याची जोड देणारी शुभांगी सोनवळे यांची प्रेरणादायी यशोगाथा

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्यालाभार्थ्यांस आर्थिक मदतीचे वितरण..

इंडिया स्किल्स कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी23 वर्षां खालील युवक-युवतींनी कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन