vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

इंडिया स्किल्स कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी23 वर्षां खालील युवक-युवतींनी कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

इंडिया स्किल्स कॉम्पिटिशनमध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी23 वर्षां खालील युवक-युवतींनी कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

 

रायगड-अलिबाग,द प्रतिनिधी- जिल्ह्यातील युवक-युवतींना आपल्या कौशल्याचा ठसा राष्ट्रीय स्तरावर उमटविण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. “इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन 2026-27 अंतर्गत जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, औद्योगिक आस्थापना तसेच उद्योगांनी आपल्या विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी व कर्मचाऱ्यांना या स्पर्धेबाबत माहिती देऊन त्यांचा सहभाग सुनिश्चित करावा, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी https://skillindiadigital.gov.in, या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या कौशल्याला राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून द्यावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र.सहायक आयुक्त, श्रीकांत कोकाटे यांनी केले आहे.

जगातील सर्वात मोठी व्यावसायिक कौशल्य स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडिया स्किल्स कॉम्पिटिशनचे आयोजन दर दोन वर्षांनी करण्यात येते. सन 2026-27 मधील स्पर्धेच्या अनुषंगाने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, विविध सेक्टर स्किल कौन्सिल तसेच औद्योगिक आस्थापना यांच्या सहकार्याने जिल्हास्तर, विभागस्तर आणि राज्यस्तरावर कौशल्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धांमधून निवड झालेल्या स्पर्धकांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी नामांकनाची संधी मिळणार आहे.

या स्पर्धेत 63 हून अधिक आधुनिक व पारंपरिक कौशल्य प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये प्रगत तंत्रज्ञान विभागांतर्गत रोबोटिक्स, थ्री-डीडिजिटल गेम आर्ट, सायबर सुरक्षा, आयटी सॉफ्टवेअर सोल्यूशन्सः अभियांत्रिकी व उत्पादन विभागात वेल्डिंग, सीएनसीटर्निंग, मेकॅट्रॉनिक्स, फाउंड्री व फॅब्रिकेशनः सर्जनशीलकला व फॅशनविभागात फॅशनटेक्नॉलॉजी, ग्राफिक डिझाइन, हेअर ड्रेसिंग, व्हिज्युअल मर्चेंडायझिंगः तसेच सेवा क्षेत्रात बेकरी, हॉटेल रिसेप्शन आणि ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी यांसारख्या विविध कौशल्यांचा समावेश आहे.

या स्पर्धेसाठी वयोमर्यादा हा प्रमुख पात्रता निकष असून, उमेदवाराचा जन्म 01 जानेवारी 2003 किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे. काही कौशल्य प्रकारांसाठी स्वतंत्र वयोमर्यादा लागू राहणारआहे.अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वैभव निवास, भंडार आळी, चेंढरे, अलिबाग येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 वर संपर्क साधावा.

000000

संबंधित पोस्ट

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची माहिती वाहनावर सुधारीत कर आकारणार

vishwatmaklokswamivarta

गडचिरोली येथील क्रांतीवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (#आयटीआय) येथे राबविण्यात आलेल्या ‘ट्रॅक्टर सर्विस मेकॅनिक’ या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमातून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या २५ विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप

महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला नवी गती!विदर्भ आणि मराठवाड्यात उद्योगांना मिळणार चालना दावोस 2025 मध्ये स्वाक्षरी झालेल्या 51 करारांपैकी 17 ला मंजुरी,एकूण गुंतवणूक ₹3,92,056 कोटी

एनसीसी प्रशिक्षणांतर्गत भोजनखर्चाचे दरपत्रक ५ मे पर्यंत पाठविण्याचे आवाहन

इग्नाईट कन्व्हेन्शनमधून मुंबई उपनगराच्या उद्योजकता विकासाला नवी दिशा

vishwatmaklokswamivarta

हरभ-यावरील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन