vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याव्यवसाय

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करून देशाची निर्यात वाढवण्यावर भर द्यावा; वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील परिषदेत तज्ज्ञांचे आवाहन

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करून देशाची निर्यात वाढवण्यावर भर द्यावा; वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील परिषदेत तज्ज्ञांचे आवाहन

मुंबई, प्रतिनिधी : देशाची आर्थिक प्रगती आणि रोजगार निर्मितीमध्ये ‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग’ (एमएसएमई) अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. या उद्योगांना सक्षम करून भारताची जागतिक स्तरावरील निर्यात दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे प्रतिपादन वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित ‘निर्यात वाढवणे, आणि एमएसएमई सक्षम करणे’ या विषयावरील विशेष सत्रात तज्ज्ञांनी केले

या कार्यक्रमात परकीय व्यापार महासंचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक राजेशकुमार मिश्रा, एक्झिम बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक हर्षा बंगारी आणि एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटरचे अध्यक्ष डॉ. विजय कलंत्री प्रामुख्याने उपस्थित होते.

‘डिस्ट्रिक्ट एक्सपोर्ट हब’ मुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती – राजेशकुमार मिश्र

परकीय व्यापार महासंचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक राजेशकुमार मिश्रा यांनी सरकारच्या ‘डिस्ट्रिक्ट एक्सपोर्ट हब’ या महत्त्वाकांक्षी योजनेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “२०१९ मध्ये सुरू झालेल्या या योजनेची आता पूर्ण अंमलबजावणी होत आहे. याद्वारे देशाच्या ग्रामीण आणि अंतर्गत भागातील लघु व मोठ्या उत्पादकांना जागतिक बाजारपेठेशी जोडले जात आहे. महाराष्ट्रातील नाशिक, ठाणे, रायगड, जळगाव आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये जिल्हा न्याय निर्यात आराखड्यांवर काम सुरू आहे.”

 

संबंधित पोस्ट

जनसामान्यांना दिलासा देणारा आणि आर्थिक शिस्त राखणारा अर्थसंकल्प सादर करण्याचा प्रयत्न करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रम

नसरापुरच्या त्या नराधमाला भरचौकात फाशी द्या – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*  

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस दलाने कठोर पावले उचलावीत – पालकमंत्री चंद्रकांत पाटील-जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा घेतला आढावा 

इयत्ता 10वी व इयत्ता 12 च्या आगामी परीक्षांसंदर्भात शंकांचे निरसनअथवा मार्गदर्शनासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुविधा उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती ‘जिल्हा नियोजन’मधून ४५८ कोटी रुपयांची तरतूद – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिताअभ्यास गट गठीत करा-कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर