vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

मुख्य कार्यकारी अधिकारी  यादव यांची वज्रेश्वरी व अनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट-पंचायत समिती भिवंडी येथे आरोग्य सेवा, SLWM Rules-2026 व घरकुल योजनांच्या कामांचा घेतला आढावा

मुख्य कार्यकारी अधिकारी  यादव यांची वज्रेश्वरी व अनगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट-पंचायत समिती भिवंडी येथे आरोग्य सेवा, SLWM Rules-2026 व घरकुल योजनांच्या कामांचा घेतला आढावा

 

ठाणे, प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे): जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी दि. ०६ ऑगस्ट २०२६ रोजी वज्रेश्वरी व अनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामपंचायत वज्रेश्वरी तसेच पंचायत समिती भिवंडी येथे भेट देऊन विविध विकासकामे व शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी आरोग्य सेवा, ग्रामपंचायतस्तरीय कामकाज, प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, SLWM Rules-2026 तसेच घरकुल योजनांच्या प्रगतीबाबत संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी सर्वप्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र, वज्रेश्वरी येथे भेट देऊन बाह्यरुग्ण विभाग, प्रयोगशाळा, औषध भांडार, लसीकरण कक्ष, प्रसूती कक्ष आदी विविध विभागांची पाहणी केली. यावेळी रुग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा, औषधांचा उपलब्ध साठा, कर्मचारी उपस्थिती तसेच आरोग्य केंद्रातील स्वच्छतेचा आढावा घेण्यात आला. नागरिकांना वेळेत व गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य केंद्रातील सर्व सुविधा कार्यक्षम ठेवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.

यानंतर ग्रामपंचायत वज्रेश्वरी येथे भेट देऊन ग्रामपंचायतीच्या विविध दप्तरांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान निदर्शनास आलेल्या त्रुटींची पूर्तता करून दप्तर अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच वज्रेश्वरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्यात आला. योजनेची प्रभावी अंमलबजावणी तसेच पाणीपट्टी वसुली वाढविण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिल्या.

वज्रेश्वरी हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ असल्याने परिसरातील स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाला विशेष महत्त्व देण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी SLWM Rules-2026 ची प्रभावी अंमलबजावणी करून घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची योग्य व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकारी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करून स्थानिक पातळीवरील समस्या व विकासकामांचा आढावाही घेण्यात आला.

त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, अनगाव येथे भेट देऊन सुरू असलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. बांधकामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाची माहिती घेण्यात आली. नवीन इमारतीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून आवश्यक कार्यवाहीनंतर इमारत हस्तांतरित करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सध्याच्या कार्यप्रणालीचाही त्यांनी आढावा घेतला.

त्यानंतर पंचायत समिती, भिवंडी येथे तालुकास्तरीय विभागप्रमुख तसेच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. यावेळी SLWM Rules-2026 ची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर विशेष भर देण्यात आला. गावांमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाची प्रभावी व्यवस्था निर्माण करून स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या

बैठकीत घरकुल योजनांतील अपूर्ण बांधकामांचाही आढावा घेण्यात आला. अपूर्ण घरकुलांची कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. तसेच VB-GRAMG योजनेअंतर्गत कोणताही पात्र घरकुल लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी दिले. शासकीय योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचण्यासाठी विभागीय समन्वयातून कामकाज करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

या भेटी व आढावा बैठकीस गटविकास अधिकारी गोविंद खामकर, सहायक गटविकास अधिकारी सुदाम इंगळे तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख, ग्रामपंचायत अधिकारी आणि संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

०००

संबंधित पोस्ट

राज्यातील जनतेचे आरोग्य सदृढ राहावे आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधा विनासायास उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासन #सार्वजनिकआरोग्य क्षेत्रात अनेक उपक्रमसार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि #युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन..

vishwatmaklokswamivarta

कर्करोग मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून कर्करोगाची तपासणी-नागरिकांनी लाभ घ्यावा- जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

गोटपॉक्स लसीकरणांतर्गत पहिल्या टप्प्यात 37.52 लाख लसमात्रांचे वाटप सुरू

जागतिक तंबाखू मुक्ती दिनानिमित्त मंत्रालयात जनजागृती कार्यक्रम तंबाखूचे अतिसेवन म्हणजे अनंत आजारांना निमंत्रण राज्यभर तंबाखू प्रतिबंध उपक्रम…

इटीसी दिव्यांग शिक्षण प्रशिक्षण केंद्रातील विशेष मुलांसाठी विशेष आरोग्य शिबीर संपन्न

राज्य कामगार विमा योजनेतील रुग्णालये होणार अत्याधुनिक- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर