vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

सेवा संकल्प अभियान : राज्यपालांचा ज्येष्ठ नागरिक, बहुविकलांग आणि अनाथ मुलांशी संवाद

मुंबई, प्रतिनिधी: राष्ट्रव्यापी सेवा संकल्प अभियानांतर्गत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी महालक्ष्मी, येथील किंग जॉर्ज पंचम मेमोरियल ट्रस्टला भेट दिली तसेच विविध सेवाकार्याची पाहणी केली. राज्यपालांनी यावेळी ट्रस्टच्या परिसरात कार्यरत विविध सेवाभावी संस्थांमध्ये उपचार, प्रशिक्षण व पुनर्वसन घेत असलेल्या लहान मुलांशी, ज्येष्ठ नागरिकांशी तसेच बहुविकलांग व बौद्धिक विकलांग व्यक्तींशी संवाद साधला.

राज्यपालांनी ‘सुकून निलाय पॅलिएटिव्ह केअर‘ केंद्रांना भेट दिली. या केंद्रांमध्ये कर्करोगाव्यतिरिक्त इतर गंभीर आजारांनी त्रस्त अंतिम अवस्थेतील लहान मुले व ज्येष्ठ रुग्णांची काळजी घेतली जाते.त्यानंतर राज्यपालांनी वात्सल्य फाऊंडेशनला भेट दिली. या ठिकाणी रस्त्यावर राहणाऱ्या अनाथ मुलांची काळजी घेतली जाते. राज्यपालांनी ‘बाल आशा धाम’ या संस्थेला भेट दिली. या संस्थेमार्फत अनाथ व परित्यक्त बालकांसाठी निवासी सुविधा तसेच दत्तक सेवा उपलब्ध करून दिल्या जातात.

राज्यपालांनी ‘ओम क्रिएशन्स’ या अन्य एका संस्थेला दिलेल्या भेटीत बौद्धिक दिव्यांग तसेच बहुविकलांग व्यक्तींशी संवाद साधला.किंग जॉर्ज पंचम ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. एरिक बोर्जेस यांनी राज्यपालांना किंग जॉर्ज ट्रस्टच्या कार्याची तसेच विस्तार योजनेची माहिती दिली.

यावेळी मुंबई महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, ट्रस्टचे विश्वस्त चेतन रायकर, भावना रॉय आणि अनिल कामत, वात्सल्य फाऊंडेशनच्या विश्वस्त स्वाती मुखर्जी, ‘बाल आशा धाम’चे कार्यकारी संचालक सुनील अरोरा तसेच ‘ओम क्रिएशन्स ट्रस्ट’च्या संस्थापक डॉ. राधिके खन्ना उपस्थित होते.

००००

 

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला बळ 

मुंबईत ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चे भव्य आयोजन-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्घाटनासाठी उपस्थित राहणार- उद्योग मंत्री उदय सामंत           

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या निवासावर 130 मतदार नोंदणीबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीविषयी जिल्हा प्रशासनाने केले वस्तुस्थितीदर्शक स्पष्टीकरण*

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगर जिल्ह्यात सुट्या पेट्रोल – डिझेल विक्रीवर बंदी  जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पाणीटंचाई, उष्माघाताबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया कर्जत – जामखेड येथे जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रशासकीय कामकाजाचा आढावा

स्पिक मॅके’च्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट