vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या निवासावर 130 मतदार नोंदणीबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीविषयी जिल्हा प्रशासनाने केले वस्तुस्थितीदर्शक स्पष्टीकरण*

*नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या निवासावर 130 मतदार नोंदणीबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमीविषयी जिल्हा प्रशासनाने केले वस्तुस्थितीदर्शक स्पष्टीकरण*

*ठाणे, प्रतिनिधी):-* दि.31 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या काही वृत्तपत्रांमध्ये “नवी मुंबई मनपा आयुक्तांच्या निवासावर 130 मतदारांची नोंदणी” अशी बातमी प्रकाशित झालेली आहे. सदर बातमीसंदर्भात मतदार नोंदणी अधिकारी, 151-बेलापूर विधानसभा मतदारसंघ यांच्या अहवालानुसार ही बाब वास्तवाशी विसंगत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

     मतदार यादी भाग क्रमांक 300 मध्ये “नेरुळ सेक्टर 21, नेरुळ रेल्वे स्टेशन, पेट्रोल पंप मार्ग, आयुक्त निवास” असे सेक्शनचे नाव नमूद आहे. येथे “मनपा आयुक्त निवास” हे केवळ विभागाचा (सेक्शन) ठळक ओळखचिन्ह (Landmark) म्हणून नमूद करण्यात आलेले आहे. या यादीभागातील कोणत्याही मतदाराचा पत्त्यामध्ये / वर “नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांचे निवासस्थान” असे नमूद नाही. त्यामुळे संबंधित बातमीत नमूद केलेली “130 मतदारांची नोंदणी आयुक्तांच्या निवासावर झालेली आहे” ही माहिती वास्तवाशी विसंगत आहे.

    मतदार यादी भाग क्रमांक 148 संदर्भात वृत्तपत्रात नमूद करण्यात आलेल्या “सुलभ शौचालय” विषयक उल्लेखाबाबत तपास करण्यात आला असता, हे ठिकाण दोन मजली असून पहिला व दुसरा मजला वास्तव्यासाठी वापरात असल्याचे निदर्शनास आले आहे. तेथील मतदार हे यापूर्वी त्या ठिकाणी वास्तव्यास होते, मात्र सध्या त्या तेथून स्थलांतरित झालेल्या असून विहित कार्यपद्धतीनुसार त्यांचे नाव वगळण्याची कार्यवाही सुरु आहे.

    मतदार नोंदणी अधिकारी, 151-बेलापूर विधानसभा मतदारसंघ यांच्या अहवालानुसार, वृत्तपत्रात प्रकाशित बातमीत कोणतेही प्रकारचे तथ्य आढळून नाही, असे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, ठाणे डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्पष्ट केले आहे.

00000000

संबंधित पोस्ट

गांधी चमन येथे ब्राह्मण समाजाचे दीपक रणवरे यांचे आमरण उपोषण मागे घेण्यात आले असून भाजप प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेण्यात आले यावेळी निवासी जिल्हाधिकारी श्री रामदास दौंड पोलीस अधीक्षक अनंत कुलकर्णी तहसीलदार धैर्यशील गवळी यांनी ब्राह्मण समाजाच्या मागण्या शासन दरबारी मान्य चे लेखी आश्वासन दिले,जालन्यात ब्राह्मण समाजाचे दीपक रणनवरे यांचे आमरण उपोषण मागे *भाजप प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या मध्यस्थीला यश; मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत लवकरच बैठक

vishwatmaklokswamivarta

लातूर ग्रामीणच्या विकासपर्वाचे शिल्पकार आदरणीय आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेब यांचा अभिष्टचिंतन सोहळा…👏🏻🎂🎊

एटापल्ली तालुक्यात उपजिविका विकास कार्यक्रमामुळे रोजगाराच्या संधी वाढणार*   – *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*     *एटापल्ली तालुक्यात बाएफ संस्थेमार्फत उपजिविका विकास कार्यक्रम*

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट; आरोग्य व्यवस्थेच्या मजबुतीकरणासाठी दिले निर्देश

vishwatmaklokswamivarta

बिहार निवडणूक आणि पोटनिवडणुका 2025: मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना मिळणार भरपगारी सुट्टी

vishwatmaklokswamivarta

लखपती दीदी अभियानाच्या वाढीव लक्षांकपूर्तीसाठी बचतगटांच्या व्यापक सहभागावर भर द्यावा – मंत्री जयकुमार गोरे