लातूर ग्रामीणच्या विकासपर्वाचे शिल्पकार आदरणीय आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेब यांचा अभिष्टचिंतन सोहळा…👏🏻🎂🎊
लातूर प्रतिनिधी
आजपासून ठीक 59 वर्षांपूर्वी म्हणजेच 30 मे 1967 साली लातूर जिल्ह्याच्या भूमीवर एका किर्तीवंत व्यक्तिमत्वाचा जन्म झाला होता.आणि त्या किर्तीवंत व्यक्तिमत्वाने कालांतराने लातूर ग्रामीणला विकासमय करण्याचा वीढा उचलला, आणि जनसामान्यांसाठी नेहमीच लढत राहिले.त्यांचा हा आजवरचा इतिहास लातूर जिल्ह्यातील लहानांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांनाच माहिती आहे.असे आपले लातूर ग्रामीणचे भाग्यविधाते, जनसामान्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे, विकासाचा ध्यास घेऊन अहोरात्र जनतेसाठी झटणारे कर्तव्यदक्ष आमदार मा. श्री. रमेशअप्पा कराड साहेब…🙇🏻♂️
आदरणीय साहेब, आपल्या उत्कृष्ट नेतृत्वामुळे लातूर ग्रामीण मतदारसंघाला एक नवी ओळख मिळाली आहे.गावागावांत रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, शेतकऱ्यांसाठी विविध योजना, युवकांसाठी रोजगाराच्या संधी, महिलांसाठी सक्षमीकरणाचे उपक्रम अशा अनेक विकासकामांच्या माध्यमातून आपण जनतेचा विश्वास जिंकला आहे.
प्रत्येक गावात विकासाची गंगा पोहोचवण्याचे कार्य आपण सातत्याने करत आहात. लातूर ग्रामीणमधील अनेक गावांमध्ये सिमेंट रस्ते, अंतर्गत गटारी, पिण्याच्या पाण्याच्या योजना, शाळांची दुरुस्ती व आधुनिकीकरण, ग्रामपंचायत कार्यालयांची उभारणी, समाजमंदिरांचे बांधकाम, शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या सुविधा अशा असंख्य कामांमुळे जनतेच्या जीवनमानात मोठा बदल घडून आला आहे. 👌सामान्य माणसाचा विकास हाच खरा राजकारणाचा केंद्रबिंदू असावा, हे आपण आपल्या कामातून सिद्ध करून दाखवले आहे.आदरणीय श्री. रमेशअप्पा कराड साहेब आपण लातूर ग्रामीण मतदारसंघातील गावागावातील मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी त्यांनी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. तसेच सर्व समाजांना समान न्याय देत विकासकामांचा आदर्श उभा केला आहे. विविध समाजांच्या समाज मंदिरांसाठी तसेच त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक धार्मिक व सामाजिक स्थळांना नवसंजीवनी मिळाली असून, ग्रामीण भागातील सांस्कृतिक वैभव अधिक समृद्ध झाले आहे. फक्त विकासकामांपुरतेच मर्यादित न राहता, आपल्या पारंपरिक संप्रदायिक संस्कृतीचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठीही आपण विशेष पुढाकार घेतला. लातूर ग्रामीणमधील महिला व पुरुष भजनी मंडळांना प्रोत्साहन देत, त्यांना आवश्यक साहित्याचा पुरवठा करून सांस्कृतिक वारसा जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आपण केले आहे. आपल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील भक्ती, संस्कार आणि सामाजिक एकोप्याची परंपरा अधिक दृढ होत आहे. 🚩
कोरोनासारख्या कठीण काळातही आपण जनतेसाठी रात्रंदिवस काम केले. गरीब, शेतकरी, विद्यार्थी, महिला, बेरोजगार युवक अशा प्रत्येक घटकासाठी आपण नेहमी तत्पर राहिलात. त्यामुळेच आज लातूर ग्रामीणमधील जनतेच्या मनात “रमेशअप्पा” हे नाव विश्वास, विकास आणि माणुसकीचे प्रतीक बनले आहे. 🔥आपल्या दूरदृष्टीमुळे लातूर ग्रामीण मतदारसंघ विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचत आहे. गावागावात होत असलेल्या विकासकामांमुळे नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. आपण घेतलेले प्रत्येक निर्णय हे जनहित डोळ्यासमोर ठेवूनच असतात, याची प्रचिती वेळोवेळी जनतेला येत आहे. 👏🏻साहेब, आपल्या ह्या जन्मदिनी मी परमेश्वराकडे आपल्या दीर्घायुष्याची अविरत प्रार्थना करतो की, आपले हे समाजकारण न कधी थांबता असेच विकासमय होत रहावं, यासाठी आपणास आपल्या जन्मदिनी मी खूप खूप शुभेच्छा देतो. 🙇🏻♂️❤️“जनतेचा आधार, विकासाचा शिल्पकार,लातूर ग्रामीणचा अभिमान, रमेशअप्पा कराड साहेब महान!” ❤️धन्यवाद!