vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मंगळागौर स्पर्धेतून संस्कृतीचा सोहळा व नारीशक्तीचा जागर – महापौर श्रीम.सुजाता पाटील

मंगळागौर स्पर्धेतून संस्कृतीचा सोहळा व नारीशक्तीचा जागर – महापौर श्रीम.सुजाता पाटील

नवी मुंबई प्रतिनिधी-एकटी व्यक्ती आनंदी होऊ शकते मात्र एकजुटीने आनंदासोबतच परिवर्तन घडू शकते असे सांगत नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी मंगळागौर स्पर्धा हे एकत्र येण्याचे माध्यम असल्याचे मत व्यक्त केले. मंगळागौर हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सोहळा आहे, या माध्यमातून नारीशक्तीचा जागर होतो असे सांगत या स्पर्धेत सहभागी होणा-या महिला या संस्कृती जोपसाणा-या दूत आहेत अशा शब्दात महापौर महोदयांनी गौरव केला. नवी मुंबई महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे आयोजित महिला मेळाव्यानिमित्त त्या आपले मनोगत व्यक्त करीत होत्या.

          महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना व उपक्रम राबवित नवी मुंबई महानगरपालिका कटिबध्द असल्याचे सांगून महापौर महोदयांनी आता एनएमएमटी बसेसमध्ये चालकही महिलाच असतील असे सांगितले. त्यादृष्टीने महिलांना चार चाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणारी योजना महासभेत मंजूर केली असल्याचे सांगून मा.मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील एकल महिलांसाठीच्या योजनांकरिताही नोंदणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

          याप्रसंगी महापौर श्रीम.सुजाता पाटील यांचेसमवेत बेलापूर विधानसभा सदस्य आमदार श्रीम. मंदाताई म्हात्रे, सभागृह नेते श्री.सागर नाईक, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीम.सलुजा सुतार, फ प्रभाग समिती सभापती श्रीम. ललिता मढवी, आरोग्य समिती सभापती डॉ.जयाजी नाथ, नगरसेवक श्री.जयवंत सुतार, नगरसेविका श्रीम.अंजनी भोईर, श्रीम. स्वाती गुरखे, श्रीम.शशिकला पाटील, श्रीम.दयावती शेवाळे, ॲड. भारती पाटील, श्रीम. मिरा पाटील, श्रीम.संतोषी म्हात्रे, श्रीम. अंजना म्हात्रे, श्रीम.प्रिती भगत, श्रीम.शिल्पा ठाकूर, श्रीम. श्रेया जिरगे, श्रीम.मिनाक्षी पाटील, श्रीम.वैष्णवी नाईक, श्रीम. माधुरी सुतार, श्रीम. अंजली वाळुंज, श्रीम. प्रतिक्षा पाटील, श्रीम.रेश्मा मढवी, माजी नगरसेविका श्रीम. उषा भोईर, श्रीम. शिल्पा कांबळी, श्रीम. संगीता म्हात्रे, श्रीम.मोनिका पाटील, समाजविकास विभागाचे उपआयुक्त श्री.प्रकाश कांबळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

          बेलापूर विधानसभा सदस्य आ.श्रीम.मंदाताई म्हात्रे यांनी मंगळागौर स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचे जतन होते असे सांगत सर्वांच्या एकत्र येण्याने हा कार्यक्रम आनंदोत्सव झाला असे मत व्यक्त केले. महिलांसाठी महानगरपालिका करीत असलेल्या योजनांची लवकरात लवकर प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी असेही त्यांनी सांगितले.

          सभागृह नेते श्री.सागर नाईक यांनी नवी मुंबई हे परस्पर प्रेमभाव जपणारे कुटुंब असल्याचे सांगत येथील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी नवी मुंबई महानगरपालिका कटिबध्द असल्याचे मत मांडले. मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील लखपती दिदी योजना यशस्वीपणे राबविण्याकडे विशेष लक्ष देण्यात येत असल्याचे सांगत मंगळागौर स्पर्धेच्या माध्यमातून परंपरेचा संस्कार जपत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

          महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रीम.सलुजा सुतार यांनी प्रास्ताविकपर मनोगतात महिला व बालकल्याण समितीमार्फत विविध 20 प्रकारच्या योजना आणि उपक्रम राबविले जात असल्याची माहिती देत महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंसाठी विक्री केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी ठोस प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. यादृष्टीने दिवाळीच्या आधी बचतगटांनी उत्पादित केलेल्या साहित्य विक्रीसाठी महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

           याप्रसंगी जीवन आधार फाऊंडेशनच्या संस्थापक ॲड.रेखा चिरनेरकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात महिलांनी आपल्यातील कौशल्ये ओळखून त्याचे रूपांतर रोजगारामध्ये कसे होईल याकडे लक्ष द्यायला हवे असे सांगत उत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी एकत्र यावे तसेच समाज माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन केले.

          महिला मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या मंगळागौर स्पर्धेची अंतिम फेरी सुरूवातीला संपन्न झाली. यामध्ये रूचिरा ग्रूप ऐरोली यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच नारीशक्ती मंगळागौर समुह नेरूळ यांनी व्दितीय आणि वाशीचा राजा महिला बचत गट वाशी यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. आदिशक्ती ग्रूप ऐरोली आणि नुतन एकता महिला मंडळ बेलापूर या महिला समुहांना उत्तेजनार्थ पारितोषिकाने सन्मानीत करण्यात आले. अंतिम फेरीत स्थान मिळविलेल्या राधेश्याम महिला मंडळ तुर्भे, धनलक्ष्मी महिला मंडळ कोपरखैरणे, संस्कृतीची शान समुह घणसोली, नव्या फाऊंडेशन घणसोली व नृत्य इल्यूजन डान्स स्टुडिओ नेरूळ या 5 नृत्यसमुहांना उल्लेखनीय सादरीकरणाबद्दल सन्मानीत करण्यात आले. नामवंत नृत्य कलावंत श्री.अशिमिक कामठे आणि आणि श्रीम.आरती पानसरे यांनी मंगळागौर स्पर्धेचे परीक्षण केले. त्यांनी सादर केलेल्या नृत्यालाही रसिकांची उत्स्फुर्त दाद मिळाली. मंगळागौर स्पर्धेत नमुंमपा क्षेत्रातील 32 महिला समुहांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून 10 समुहांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली. यामध्ये सर्व वयोगटातील महिलांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला.

          याप्रसंगी 65 महिला बचत गट व महिला मंडळे यांनी उत्पादित केलेल्या साहित्याचे स्टॉल्स लावण्यात आले होते. सकाळी 9 वा. पासून महिलांच्या मंगळागौर स्पर्धेच्या अंतिम फेरीतून सुरू झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगलेल्या या महिला मेळाव्याच्या विशेष कार्यक्रमाप्रसंगी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

0000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणस्थळी जलपूजन संपन्न

vishwatmaklokswamivarta

आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांचा चर्चगेट रेल्वे स्टेशन ते मुंबई पोलीस आयुक्तालय असा भव्य मोर्चा…

शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एसटीची 1800 221 251 हेल्पलाईन सुरू’- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

सिपेट अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात…

vishwatmaklokswamivarta

संगमनेर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीचे काम लवकरच मार्गी लावणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास 8 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta