vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील अमोघ बनसोडे या विद्यार्थ्याची साता समुद्रापार गुणवत्तापूर्ण झेप

नवी मुंबई महानगरपालिका शाळेतील अमोघ बनसोडे या विद्यार्थ्याची साता समुद्रापार गुणवत्तापूर्ण झेप

        नवी मुंबई प्रतिनिधी-    नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.120 या शाळेचा इयत्ता दहावीतील विद्यार्थी अमोघ बनसोडे याची इंग्लड मध्ये डेव्हॉन येथे होणा-या सीड्स ऑफ पीस इंटरनॅशनल कॅम्प 2026 या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर नेतृत्व, संवादकौशल्य व शांतता प्रस्थापनेविषयी प्रशिक्षण दिले जाणार आहे.अमोघ बनसोडे हा दिनांक १८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत इंग्लंड येथे आयोजित आंतरराष्ट्रीय शिबिरात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. अमोघचे हे यश नवी मुंबई महानगरपालिकेसाठी अभिमानास्पद असून, त्याच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी देशातील १३ राज्यांमधून ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. कठोर निवड प्रक्रियेनंतर अंतिम १७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये अमोघ बनसोडे याने स्थान मिळविले आह

   रबाले येथे रहात असलेल्या अमोघ बनसोडेचे वडील ट्रक चालक असून त्याची आई गृहिणी आहे. त्याला दोन बहिणी असून, त्यापैकी एक इयत्ता बारावीमध्ये तर दुसरी द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. घरातील कोणीही उच्चशिक्षित नसतानाही त्याने जिद्द व मेहनतीच्या जोरावर हे उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महापौर श्रीम.सुजाता पाटील, आयुक्त डॉ.कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी संपादन केलेल्या यशाबद्दल अमोघचे अभिनंदन व कौतुक केले असून त्याला शुभेच्छा प्रदान केल्या आहेत.

   अमोघच्या या यशात नमुंमपा शाळा क्र. 120 च्या मुख्याध्यापिका श्रीम.गोमती श्रीनिवासन, तसेच सहकारी शिक्षक श्री.यश पंत, श्रीम.नूरसबा शेख, रुथ अनूग्रह यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, अमोघच्या या यशामुळे नवी मुंबई महानगरपालिका शाळांचा गौरव वाढला आहे

0.0000

 

संबंधित पोस्ट

डिजिटल जनगणना 2027′ च्या तयारीला वेग; जिल्हास्तरीय क्षेत्रीय प्रशिक्षण संपन्न-जनगणनेचे कार्य अचूकपणे पूर्ण करा- डॉ. प्रवीणकुमार देवरे

🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे — ✅ ‘उत्कृष्टता केंद्रा’चे भूमिपूजन ✅ ‘चक्र’ (सेंटर फॉर हेल्थ, अप्लाइड नॉलेज अँड रिसर्च ऑटोनॉमी) चे उदघाटन

कोलंबियामधील बुकारामंगा इथे झालेल्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड 2026 मध्ये सहभागी झालेल्या भारताच्या पाचही विद्यार्थ्यांनी पटकावली सुवर्ण पदके

समाजकल्याण कार्यालयात तृतीयपंथीय स्मृतीदिन उत्साहात साजरा; समान हक्क व सन्मानावर भर

vishwatmaklokswamivarta

महाडीबीटीद्वारे मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती;ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने अंतिम मतदार यादी सुधारित कार्यक्रम जाहीर-विक्रांत चव्हाण-उपजिल्हाधिकारी (महसूल)

vishwatmaklokswamivarta