vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

महिलासक्षमीकरणठाणे पोलीस दलातील शीतल खरटमल यांची ऐतिहासिक कामगिरी; बँकॉक आशियाई सुमो कुस्ती स्पर्धेत कास्य पदक

#महिलासक्षमीकरणठाणे पोलीस दलातील शीतल खरटमल यांची ऐतिहासिक कामगिरी; बँकॉक आशियाई सुमो कुस्ती स्पर्धेत कास्य पदक

खेळ प्रतिनिधी

     जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर ठाणे ग्रामीण पोलीस दलातील महिला पोलीस अंमलदार शीतल मल्लिकार्जुन खरटमल यांनी बँकॉक (थायलंड) येथे पार पडलेल्या आशियाई सुमो कुस्ती स्पर्धेत कास्य पदक (Bronze Medal) पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या यशासह त्यांनी जागतिक क्रमवारीत पाचवे स्थान प्राप्त केले असून, त्यांची २०२६ मध्ये किरगीस्थान येथे होणाऱ्या ‘वर्ल्ड कॉम्बॅट गेम्स’ आणि ‘वर्ल्ड नोमाड गेम्स’साठी निवड झाली आहे.

     पदकांचा डोंगर आणि जागतिक भरारी

     शीतल खरटमल या ज्युडो आणि मार्शल आर्टमधील आंतरराष्ट्रीय खेळाडू असून त्यांनी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे ३० वेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या नावावर ७२ सुवर्ण, ४७ रजत आणि १७ कास्य पदके आहेत. विशेष म्हणजे, डिसेंबर २०२५ मध्ये रशिया (मॉस्को) येथील कॉमनवेल्थ कप आणि २०२३ मध्ये जपान (टोक्यो) येथील एशियन गेम्समध्येही त्यांनी कास्य पदक मिळवून देशाचा तिरंगा फडकवला आहे.

     पोलीस दलात मोलाचे योगदान

     २००९ मध्ये खेळाच्या माध्यमातून ठाणे ग्रामीण पोलीस दलात भरती झालेल्या शीतल सध्या पोलीस जिमच्या इन्चार्ज म्हणून कार्यरत आहेत. त्या केवळ स्वतः सराव करत नाहीत, तर आयपीएस अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या पाल्यांनाही प्रशिक्षण व मार्गदर्शन करत आहेत.

    मार्शल आर्टमध्ये ‘ब्लॅक बेल्ट ३ डिग्री’ प्राप्त असलेल्या शीतल यांनी शासनाच्या ‘स्वयंसिद्धा’ प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत सुमारे १२ ते १५ हजार महिलांना स्वसंरक्षणाचे मोफत धडे दिले आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना ‘भारत विभूषण’, ‘भारत श्री’, ‘अर्जुन पुरस्कार’ (पंजाब सरकार) आणि ‘आयकॉनिक भारत गौरव’ अशा ५१ हून अधिक शासकीय व निमशासकीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

     “माझ्या यशाचे संपूर्ण श्रेय माझे कुटुंब आणि मार्गदर्शक, विशेषतः माझी आई यांना जाते,” अशा भावना शीतल यांनी व्यक्त केल्या. या प्रवासात त्यांना भारतीय सुमो फेडरेशनचे अध्यक्ष यतिश बंगेरा, सचिव चंद्रशेखर शिंदे आणि कोच अजय साबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

     सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर कन्या प्रशाला आणि वालचंद कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलेल्या शीतल यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. 00000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन;75 हून अधिक राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान; 250 खेळाडूंचा विविध उपक्रमांत सहभाग

vishwatmaklokswamivarta

खेळाडूंना उत्तम सोयी सुविधा पुरविण्याबरोबरच संकुलाच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत – पालकमंत्री जयकुमार गोरे

खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्रातंर्गत शूटिंग खेळाची निवड चाचणी; 25 सप्टेंबरला उपस्थित राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

🇮🇳 भारतीय पॅरा ॲथलीट्सची सुवर्ण कामगिरी!वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स २०२६’ मध्ये भारतीय खेळाडूंनी आपल्या कौशल्याने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.पुरुषांच्या उंच उडीत भारताला दोन सुवर्णपदके

जालना येथे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाने बेल्जियमविरुद्धच्या शानदार विजयाने युरोप दौऱ्याची सुरुवात केली.

vishwatmaklokswamivarta