vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

महसूल विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना प्रारंभ क्रीडा, कलागुणांची जोपासना आवश्यक- विभागीय आयुक्त पापळकर

महसूल विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना प्रारंभ

क्रीडा, कलागुणांची जोपासना आवश्यक- विभागीय आयुक्त पापळकर

 छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- कामकाजातील तणाव घालविण्यासाठी क्रीडा व कलागुणांची जोपासना करणे आवश्यक आहे. त्यासाठी महसूल विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी स्पर्धांमधील आपला सहभाग वाढवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी महसूल विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना केले.
विभागीय क्रीडा संकूल येथे आज महसूल विभागाच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांना सुरुवात झाली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, अपर आयुक्त रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी (सामान्य) संगिता राठोड, संगिता सानप, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी, उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, संतोष गोरड, अरुण जऱ्हाड, नीलम बाफना तसेच सर्व उपजिल्हाधिकारी, तहसिलदार व कर्मचारी तसेच कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, आपल्या दैनंदिन जगण्यात खिलाडुवृत्तीने जगायचे असते, त्या खिलाडुवृत्तीची जोपासना अशा स्पर्धांमुळे होते. त्यामुळे वातावरण सकारात्मक होऊन निकोप स्पर्धा निर्माण होते. क्रीडा व सांस्कृतिक गुणांची जोपासना ही आयुष्यात आवश्यक असते,असेही त्यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त पापळकर म्हणाले की, आपल्यातला गुणांचा विकास करण्यासाठी खेळा. छत्रपती संभाजीनगर विभागाला राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळायला हवे या जिद्दीने खेळा. उत्कृष्ट सादरीकरणाचा ध्यास घ्या. तणावमुक्त जीवन जगायचे असेल तर क्रीडांगणावर सराव करुन , खेळून घाम गाळावा लागतो असेही त्यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी केले. या स्पर्धांमधील विजेते खेळाडू व संघ हे विभागीय क्रीडा स्पर्धांसाठी पाठविले जातील. विभागीय क्रीडा स्पर्धा ह्या परभणि येथे दि.३ ते ५ एप्रिल दरम्यान होणार आहेत.

०००००

संबंधित पोस्ट

क्रीडा दिनानिमित राज्यभर २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान क्रीडा महोत्सव

मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत खेळाडू निवड चाचणी १४ व १५ जुलै रोजी

नोएडातील राष्ट्रीय कराटे स्पर्धेत जालना जिल्ह्याची सुवर्ण झेप,जालन्यात विजेत्या कराटेपटूंचे जल्लोषात स्वागत; महापौर वंदना मगरे यांच्या हस्ते सत्कार, अक्षय गोरंट्याल यांची उपस्थिती, शहरातून विजयी रॅली

नवी मुंबई महानगरपालिका चषक महाराष्ट्र राज्य ज्युनिअर व्हॉलीबॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा 2025-26 चा दिमाखदार शुभारंभ..

vishwatmaklokswamivarta

भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाने बेल्जियमविरुद्धच्या शानदार विजयाने युरोप दौऱ्याची सुरुवात केली.

vishwatmaklokswamivarta

ॲथलेटिक्स आणि कुस्तीचे निपुणता केंद्र सज्ज; प्रतिभावान खेळाडूंनी 20 मार्चपर्यंत अर्ज करावेत