vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत खेळाडू निवड चाचणी १४ व १५ जुलै रोजी

मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत खेळाडू निवड चाचणी १४ व १५ जुलै रोजी

 

मिशन लक्ष्यवेध योजनेंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी अॅथलेटिक्स, हॉकी आणि रोईंग या खेळांच्या खेळाडू निवड चाचण्यांचे आयोजन दि. १४ व १५ जुलै २०२६ रोजी करण्यात आले आहे.

 

⁵जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे सकाळी १० वाजता अॅथलेटिक्स व हॉकीच्या निवड चाचण्या होणार आहेत. रोईंगची निवड चाचणी दि. १४ जुलै रोजी सकाळी १० वाजता एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, लोणी काळभोर येथे होईल.

 

२५ वर्षांखालील महाराष्ट्रातील राज्यस्तरीय पदकविजेते किंवा राष्ट्रीय स्तरावरील सहभागी खेळाडू पात्र असून, निवड चाचणीसाठी जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, मागील दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे, मूळ कागदपत्रे, सत्यप्रती आणि तीन पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.अधिक माहितीसाठी सुरेश काकड (८८८८८०६१५८), ज्योती सूर्यवंशी (९०७५०४०३२०), मनीषा माळी (७३९१९६८१९२) किंवा मनीषा दिवेकर (९७६४३८५१५२) यांच्याशी संपर्क साधावा.#मिशनलक्ष्यवेध #क्रीडा #खेळाडूनिवड #पुणे #युवा #महाराष्ट्र

संबंधित पोस्ट

माजी सैनिक,पत्नी,विधवा व पाल्य यांचा विशेष गौरव;दि.२० सप्टेंबर पर्यंत प्रस्ताव मागविले

दक्षिण कमांड सुवर्ण चषक 2025 – परंपरा व घोडेस्वारीतील उत्कृष्टतेचा उत्सव

अमरावती विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत यवतमाळ जिल्हा अव्वल विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्या हस्ते बक्षिस वितरित

क्रीडा प्रबोधिनी प्रवेश प्रक्रिया सुरू; खेळाडूंना प्रशिक्षणाची संधी…

शिवछत्रपती क्रीडापीठाच्या क्रीडा प्रबोधिनींसाठी प्रवेश सुरू; 23 एप्रिलपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

टेबल टेनिसच्या मैदानात जिल्हाधिकाऱ्यांची फटकेबाजी-जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या प्रत्यक्ष सहभागाने खेळाडूंमध्ये संचारले नवचैतन्य