vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आता खैर नाही खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश !  दिव्यांगांच्या डब्यात आरपीएफ जवान तैनात राहणार ..

दिव्यांगांच्या आरक्षित रेल्वे डब्यांमध्ये बसणाऱ्यांची आता खैर नाही खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला यश !  दिव्यांगांच्या डब्यात आरपीएफ जवान तैनात राहणार ..

 

ठाणे प्रतिनिधी – मुंबई उपनगरीय मध्य रेल्वेच्या दिव्यांगांसाठी आरक्षित डब्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सामान्य व सक्षम प्रवासी प्रवेश करत असल्याने दिव्यांग प्रवाशांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे, मुंबई यांच्याकडे निवेदन देऊन ठोस उपाययोजनांची मागणी केली होती. त्यांच्या मागणीला यश आले असून दिव्यांगांच्या डब्यात आरपीएफ जवान तैनात राहणार आहेत. तसेच दिव्यांगांच्या डब्यात प्रवास करणाऱ्या सक्षम प्रवाशांवर कारवाई होणार आहे.

दिव्यांग डब्यांमध्ये अनधिकृत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांकडून तात्काळ दंड वसूल करणे, वारंवार नियमभंग करणाऱ्यांवर अधिक कठोर दंडाची तरतूद करणं, प्रत्येक स्थानकावर ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृतीपर सूचना देणं, प्रत्येक डब्यात दिव्यांग आरक्षित डब्याबाबत सूचना प्रसारित करणं, तिकीट खिडक्यांसमोर व दिव्यांग डब्याजवळ मोठे माहितीफलक लावणं तसेच दिव्यांग डबे अधिक ठळक पद्धतीने ओळखता येतील अशी चिन्हे लावण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती.

या पाठपुराव्याची दखल घेत मध्य रेल्वे प्रशासनाने दिव्यांगांसाठी आरक्षित डब्यांच्या सुरक्षेसाठी आरपीएफ जवानांची नियुक्ती केली आहे. या निर्णयामुळे दिव्यांग प्रवाशांना सुरक्षित व सन्मानाने प्रवास करता येणार असून अनधिकृत प्रवाशांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे, अशी माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.

या सकारात्मक निर्णयाबद्दल डोंबिवली येथील साक्षात दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष सचिन निवृत्ती गरुड, धर्मवीर दिव्यांग सेनेचे शरद पवार, गिरीश मेहरोल यांनी सर्व दिव्यांग बांधवांच्या वतीने या निर्णयाचे स्वागत केले असून खासदार नरेश म्हस्के यांचे आभार मानले आहेत. दिव्यांग बांधवांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सुरक्षित, सुलभ प्रवासासाठी माझा पाठपुरावा यापुढेही कायम राहील, अशी ग्वाही खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे.

-0000

संबंधित पोस्ट

शिर्डीत भाविकांची अडवणूक करणाऱ्या एजंटांवर प्रतिबंधात्मक कारवाई-उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी जारी केले आदेश …

vishwatmaklokswamivarta

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण..

vishwatmaklokswamivarta

भाजप महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांची जालना महानगरातील योगेश नगर व महादेव मंदिर परिसराला भेट

अल्पसंख्याक विकास विभागाद्वारे ‘गेटवे ऑफ इंडिया’ समोर विशेष कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

९ ते २३ जूनदरम्यान कायदा व सुव्यवस्थेसाठी जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू

राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक अ‍ॅड नाझेर काझी

vishwatmaklokswamivarta