vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

शहापूर प्रकल्पांतर्गत 12 वसतीगृहांचा समावेश, अर्ज करण्याचे जाहीर आवाहन

शहापूर प्रकल्पांतर्गत 12 वसतीगृहांचा समावेश, अर्ज करण्याचे जाहीर आवाहन

ठाणे, प्रतिनिधी :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर (ता. शहापूर, जि. ठाणे) यांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या एकूण 12 शासकीय आदिवासी वसतीगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 या वर्षासाठीचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले आहेत. यामध्ये 9 मुलांची व 3 मुलींची शासकीय वसतीगृहे समाविष्ट असून, पात्र आदिवासी विद्यार्थ्यांनी आपले अर्ज विहित मुदतीत ऑनलाइन भरावेत, असे जाहीर आवाहन प्रकल्प कार्यालयाद्वारे करण्यात आले आहे.

   राज्यातील विभागीय, जिल्हा, तालुका व ग्रामीण स्तरावर अनुसूचित जमातीच्या (ST) विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, या उद्देशाने आदिवासी विकास विभागाद्वारे शासकीय वसतीगृह योजना राबविली जाते. तसेच, विभागीय व जिल्हा स्तरावर इयत्ता 12 वी नंतर पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना’ (सन 2016-17 पासून) लागू करण्यात आली आहे.

     शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये विभागीय व जिल्हा स्तरावर इयत्ता 12 वी नंतर पुढे उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शासकीय वसतीगृह अथवा ‘पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजना’ यांपैकी कोणत्याही एका योजनेची निवड करावी. विद्यार्थ्यांनी दि.01/07/2026 पासून किंवा त्यांच्या संबंधित अभ्यासक्रमाचा निकाल लागल्यापासून 1 (एक) महिन्याच्या आत swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणी करणे अनिवार्य आहे.

त्याचप्रमाणे, विभागीय व जिल्हा स्तरावर इयत्ता 11 वी व 12 वी मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी, तसेच तालुका व ग्रामीण स्तरावर इयत्ता 8 वी पासून पुढे शिक्षण घेणाऱ्या सर्व नवीन व जुन्या (नूतनीकरण) प्रवेशार्थी विद्यार्थ्यांनी शासकीय वसतीगृह प्रवेशासाठी वरील संकेतस्थळावर तात्काळ ऑनलाइन अर्ज नोंदणी करावी.

अर्ज नोंदणीसाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना (युझर मॅन्युअल) संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ऑनलाइन नोंदणीकृत केलेले परिपूर्ण अर्ज आवश्यक त्या सर्व योग्य दस्तऐवजांसह (कागदपत्रांसह) विहित कालावधीत सादर करणे आवश्यक आहे. वसतीगृह प्रवेशासाठीचे अर्ज संबंधित गृहपालांकडे, तर ‘पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजने’चे अर्ज संबंधित महाविद्यालयांकडे जमा करावेत. ऑनलाइन अर्ज नोंदणी करताना काही अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी तात्काळ नजीकच्या शासकीय वसतीगृहाच्या गृहपालांशी (Warden) संपर्क साधावा.

इच्छुक व पात्र आदिवासी विद्यार्थ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी दिलेल्या संकेतस्थळाला त्वरित भेट देऊन आपला अर्ज अचूक व मुदतीत सादर करावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो आणि मिटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

जालन्याचा ‘शाकाहारी आयर्नमॅन’ कैलास झोळगेंची ऐतिहासिक कामगिरी

सियाल इंडिया २०२५ मध्ये ‘उमेद’चा डंका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांमुळे ‘उमेद’ महिलांची उत्पादने जागतिक बाजारपेठेत पोहोचणार

कामात गती, पारदर्शकता ठेवत अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख होऊन काम करा – पालकमंत्री विखे पाटील-श्रीगोंद्यात ‘बिबट रेस्क्यू सेंटर’ व वनविभागाच्या जागेवर विकास प्रकल्प उभारण्याच्या सूचना..

vishwatmaklokswamivarta

जालना शहरात पाम सण्डे निमित्त प्रभात फेरी उत्साहात संपन्न

जिल्हा परिषद, ठाणे येथे भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta