परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीनिवडीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत
रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:-परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी मिळणाऱ्या परदेश शिष्यवृत्ती निवडीसाठी सन-२०२६-२७ करिता पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन कार्यालय अधीक्षक, सहायक आयुक्त, समाज कल्याण माधुरी पाटील यांनी केले आहे.
योजनेच्या अटी व शर्ती- विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थी अनुसूचित जाती / नवबौद्ध घटकातील असावा. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्षे व पीएचडीसाठी ४० वर्षे ही कमाल वयोमर्यादा असेल. विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. ८.०० लाखांपेक्षा जास्त नसावे. याबाबत सक्षम प्राधिकारी तथा तहसिलदार यांचा उत्पन्नाचा दाखला देण्यात यावा. (विवाहित महिला उमेदवारांनीपतीकडील कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक आहे. जर विवाहित महिलाउमेदवार विधवा, घटस्फोटित असून वडिलांकडे वास्तव्यास असल्यास महिला उमेदवारानेवडिलांकडील कुटुंबाच्या उत्पन्नानुसार अर्ज केल्यास तसे कायदेशीर कागदपत्रे सादर करणे आवश्यकआहे. परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दोन वर्षे (दिनांकानुसार) कालावधीचा MBA अभ्यासक्रम अनुज्ञेय राहील. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील MD व MS अभ्यासक्रम प्रवेशासाठी पात्र असतील. शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी ३०% जागांवर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल.जर त्याप्रमाणात मुलींचे प्रवेश अर्ज प्राप्त न झाल्यास त्या जागेवर मुलांची गुणवत्तेनुसार निवडकरण्याचे अधिकार निवड समितीला राहतील. पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविकाअभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत व पीएचडीसाठी पदव्युत्तर परीक्षेत किमान ५५% गुण असणेआवश्यक आहे. परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीतील (QS World UniversityRank) २०० च्या आत असावी. तथापि २०० मधील The University of South Wales (UNSW Sydney), Australia हेविद्यापीठ सदरील योजनेतून वगळण्यात येत आहेत. तसेच परदेशातील विद्यापीठ Third PartySponsor ग्राह्य धरतात किंवा नाही याची खात्री करण्याची जबाबदारी विद्यार्थ्याची असेल. शासनाने सर्व विभागाच्या परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या निकषामध्ये समानता आणण्याकरिता सर्वंकष धोरण ठरविले आहे. त्यामुळे नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार तयार केलेल्या सर्वंकष नियमावलीचे सर्व विभागांनी पालन करणे अपेक्षित असल्याने नियोजन विभागाने घेतलेला शासन निर्णय अंतिम असेल. त्यानुसार सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दि. ३०.१०.२०२३ रोजीया संदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्या संदर्भात दि. ९.११.२०२३ रोजी शासनशुद्धीपत्रक निर्गमित केलेले आहे. या योजनेंतर्गत लाभ घेवू इच्छित असलेल्या विद्यार्थ्यास पुढील सत्राचा लाभ मिळण्यासाठी परदेशातील प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमामध्ये प्रत्येक वेळी उत्तीर्ण होणे बंधनकारक असून त्यासाठी शैक्षणिक संस्था/विद्यापीठाचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, प्रगती अहवाल प्रत्येक सत्रासाठी किंवा सहा महिन्यासाठी वेळेवर सादर करणे अनिवार्य आहे. परिपूर्ण अर्ज व कागदपत्रे सादर करण्याची जबाबदारी अर्जदाराची राहील. अपूर्ण कागदपत्र असलेल्या
अर्जावर कार्यवाही करता येणार नाही. विद्यार्थ्याने परदेशातील विद्यापीठामध्ये अशा अभ्यासक्रमाची निवड करावी, जेणे करून सदर,विद्यार्थ्यास शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वतःच्या कौशल्याच्या आधारे देशांतर्गत रोजगार व स्वयं रोजगार मिळवता येईल. DG Locker द्वारे कुटुंबातील व्यक्तीची आधारकार्ड व पॅनकार्ड तपासणीसाठी आमची सहमती आहे. अटी व शर्तीच्या सविस्तर जाहिरातीप्रमाणे व शासन निर्णयानुसार लागू राहतील.सदरील वेबसाईट वरून अर्ज डाउनलोड करून तो परिपूर्ण व आवश्यक त्या सुस्पष्ट व वाचनीय कागदपत्रांसह दिनांक: १५/५/२०२६ पर्यंत सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत https://fs.maharashtra.gov.in यावेबसाईट वर ऑनलाईन सादर करावा.
योजनेतील लाभाचे स्वरूप- परदेशातील शैक्षणिक संस्थेने पत्रामध्ये नमूद केलेल्या शैक्षणिक कालावधीपासून लागू केलेली संपूर्ण शिक्षण फी, अभ्यासक्रमासाठी नजीकच्या मार्गाने Economy Class विमान प्रवास भाडे, (परतीच्या प्रवासासह) निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा यावरील विद्यार्थ्याने प्रत्यक्ष केलेला खर्च विहित केलेल्या वित्तीय मर्यादेत अदा करण्यात येईल. सर्वसाधारण पदव्युत्तर पदवीसाठी २ वर्ष किंवा प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचा कालावधी यापेक्षा जो कमी असेल त्या अभ्यासक्रमासाठी नजीकच्या मार्गाने Economy Class विमान भाडे, परतीच्या भाड्यासह, शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, वैयक्तिक आरोग्य विमा यासह शाखा/अभ्यासक्रम निहाय मार्गदर्शक तरतुदीनुसार परदेशी शिष्यवृत्ती अदा करण्यात येईल. विद्यार्थ्यांस वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर राष्ट्रांसाठी USD १५,४०० तर युकेसाठी GBP ९,९०० इतक्या रक्कमेच्या मर्यादेत निर्वाह भत्ता संबंधित विद्यार्थ्यांच्या परदेशातील वैयक्तिक खात्यामध्ये जमा केला जाईल. विद्यार्थ्याला आवश्यक ती क्रमिक पुस्तके, वह्या व स्टेशनरी, प्रबंध अहवाल तयार करणे, टायपिंग व बायंडिंग, स्थानिक भेटी व इतर अभ्यास सहली प्रवास खर्च, प्रबंधासाठी आवश्यक खर्च, इतर प्रासंगिक खर्चासाठी USD १५०० आणि युकेसाठी GBP ११०० इतका आकस्मिक खर्च म्हणून म्हणून प्रत्येक वर्षी दिले जात आहे