vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना युवकांसाठी सुवर्णसंधी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना युवकांसाठी सुवर्णसंधी इच्छुक व पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:-केंद्र शासनामार्फत राबविण्यात येणारी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) ही देशातील युवकांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळवून देणारी अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना देशातील नामांकित कंपन्यांमध्ये उमेदवारांना ६ ते ९ महिन्याकरिता इंटर्नशिप देण्यात येणार असून प्रतिमहा रु.९०००/- एवढे विद्यावेतन अदा करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, १२ एप्रिल २०२६ पर्यंत Customer Care Service व एचडीएफसी बँक, १४ एप्रिल २०२६ पर्यंत Sales & Marketing या क्षेत्रामध्ये सदर कंपन्यांमध्ये अर्ज करण्यासाठी संधी उपलब्ध आहे.

या योजनेमुळे युवकांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष कामाचा अनुभव, नवीन कौशल्ये आत्मसात करण्याची संधी, व्यावसायिक नेटवर्क तयार होणे, आत्मविश्वास व व्यक्तिमत्व विकास यामध्ये वाढ होणे इत्यादी बाबींचा मोठा फायदा होणार आहे.

या योजनेचा तिसरा टप्पा (Round ३) सुरू असून, प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा (PMIS) लाभ घेण्याकरिता उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करुन कंपनीतील रिक्तपदांसाठी अर्ज करता येईल. अर्ज करण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन त्वरित अर्ज करावा. अधिकच्या माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड-अलिबाग या कार्यालयास भेट द्यावी.

रायगड जिल्हयातील जास्तीत-जास्त इच्छुक व पात्र उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा व आपल्या करिअरची भक्कम पायाभरणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीम. अ.मु.पवार यांनी केले आहे.

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PM Internship Scheme / PMIS) योजना काय आहे:- ही भारत सरकारची एक महत्त्वाची योजना असून, जी युवकांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव (practical experience) देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.ही योजना म्हणजे विद्यार्थ्यांना आणि बेरोजगार तरुणांना मोठ्या कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष काम शिकण्याची आणि काही प्रमाणात उत्पन्न मिळवण्याची संधी देणारी सरकारी योजना आहे. ही योजना केंद्र सरकारने (कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे) सुरू केली आहे. यामध्ये तरुणांना देशातील टॉप २ हजार कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी दिली जाते.

योजनेचे मुख्य उद्दिष्टे: युवकांना कामाचा प्रत्यक्ष अनुभव देणे. त्यांची स्किल्स (कौशल्ये) वाढवणे. त्यांना नोकरीसाठी तयार करणे (employability वाढवणे), शिक्षण आणि प्रत्यक्ष काम यामधील अंतर कमी करणे.

लाभ (Benefits): प्रतिमहा सुमारे ९,००० स्टायपेंड, ६ ते ९ महिन्यांची इंटर्नशिप, मोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी, अनुभवामुळे पुढे नोकरी मिळण्याची शक्यता वाढते, सदरचे विद्यावेतन हे थेट उमेदवाराच्या बँक खात्यामध्ये DBT द्वारे जमा करण्यात येणार आहे, Life & Personal Accident Insurance देण्यात आला आहे, एकवेळीचे विशेष अनुदान म्हणून उमेदवारास रु.६००० ची रक्कम DBT द्वारे २ हप्त्यांत दिली जाते— पहिले १५ दिवसांत रु.३००० आणि दुसरे ३ महिने पूर्ण झाल्यानंतर रु.३००० इंटर्नशिपचे १५ दिवसांत दिले जातात, उमेदवारास सरकारकडून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) व प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना (PMSBY) योजनांद्वारे विमा संरक्षण दिले जाईल आणि कंपनीकडून अतिरिक्त फायदेही मिळू शकतात.पात्रता (Eligibility साधारण) :- वय साधारण १८ ते २५ वर्षे. दहावी, बारावी, आय.टी.आय.,डिप्लोमा, पदवी, पदवीधर,बी.ई., बी.टेक, इ. आहे. भारतीय नागरिक असणे आवश्यक. सध्या फुल-टाईम नोकरी नसावी.

अर्ज कसा करावा: प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा (PMIS) लाभ घेण्याकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकृत https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. उमेदवाराची नोंदणी पूर्ण झाल्यावर नामांकित कंपनीतील रिक्तपदांसाठी अर्ज करता येईल.

ज्या उद्योजकांना प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेंतर्गत उमेदवार भरती करावयाचे आहेत अशा उद्योजकांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रायगड-अलिबाग या कार्यालयाच्या (०२१४१) २२२०२९ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

०००००००

संबंधित पोस्ट

सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी खातेदारांना आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंतिम मुदत दि.28 फेब्रुवारी

vishwatmaklokswamivarta

देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे भारत पर्यटनकडून बी2बी पर्यटन मेळाव्याचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात २९० पदांची भरती;कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १४४ पदांसह विविध जागा

vishwatmaklokswamivarta

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे ६० जप्त वाहनांचा २७ मे रोजी ई-लिलाव* *इच्छुकांनी २१ मे पूर्वी नोंदणी करावी

कौशल्यपूर्ण प्रशिक्षण घेऊन यशस्वी उद्योजक व्हा- जिल्हाधिकारी अशोक काकडे- एनएसएसच्या विद्यार्थ्यांना कृषि उद्योग दूतचे प्रशिक्षण 

vishwatmaklokswamivarta

मुंबईत कॉटन ग्रीन येथे केंद्र सरकारच्या कार्यालय संकुलाची उभारणी करण्यासाठी मुंबई बंदर प्राधिकरणाने एनबीसीसी बरोबर केला करार

vishwatmaklokswamivarta