vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई महापौर बंगल्यातील कर्मचाऱ्यांसोबत महापौरांनी साजरी केली ‘कृतज्ञतेची राखी’महापौर श्रीमती रितू तावडे व आमदार श्रीमती चित्राताई वाघ यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा

मुंबई महापौर बंगल्यातील कर्मचाऱ्यांसोबत महापौरांनी साजरी केली ‘कृतज्ञतेची राखी’महापौर श्रीमती रितू तावडे व आमदार श्रीमती चित्राताई वाघ यांच्या उपस्थितीत पार पडला सोहळा

मुंबई प्रतिनिधी-🔷”रक्षाबंधन सण हा केवळ रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नसून तो प्रेम, विश्वास, काळजी आणि संरक्षणाचा अतूट धागा आहे. दिवस-रात्र सेवा देणारे महापौर बंगल्यातील सर्व कर्मचारी हे आमचे कुटुंबच आहेत,” असे भावोद्गार मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी काढले.

🔷भायखळा स्थित महापौर निवासस्थानी आज (दिनांक २८ ऑगस्ट २०२६), महापौर बंगल्यातील सर्व कर्मचाऱ्यांसमवेत रक्षाबंधन सण कौटुंबिक वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आमदार श्रीमती चित्राताई वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.

🔷महापौर श्रीमती रितू तावडे व आमदार चित्राताई वाघ यांनी कर्मचाऱ्यांना स्वतः राखी बांधून त्यांचे औक्षण केले तसेच त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी व दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सण-उत्सवाच्या काळातही कर्तव्यावर तत्पर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या छोटेखानी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

संबंधित पोस्ट

प्रत्येक कुटुंबाची माहिती मोबाईल ॲपवर नोंदवून जनगणना केली जाईल     -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

पुढील चार वर्षात देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्व. भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

जीडीसी अँड ए’ परीक्षा 23 ते 25 रोजी ; प्रवेशपत्रासाठी आवाहन

vishwatmaklokswamivarta

भारतीय जनगणना २०२७’ विषयक प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटन 

vishwatmaklokswamivarta

जलयुक्त शिवार २.० आढावा बैठकजलसंधारणाची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा-जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

अंबाजोगाई येथे ११०० खाटांचे नवीन रुग्णालय उभारणार-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ