vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

वर्ल्ड इनोव्हेशन अँड चेंज मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या वतीने महापारेषणला ‘पीआरओ पीआर ग्लोब सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कम्युनिकेशन अचिव्हमेंट अवॉर्ड्स-२०२५’ या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट मानाचा पुरस्कार जाहीर

वर्ल्ड इनोव्हेशन अँड चेंज मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या वतीने महापारेषणला ‘पीआरओ पीआर ग्लोब सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कम्युनिकेशन अचिव्हमेंट अवॉर्ड्स-२०२५’ या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट मानाचा पुरस्कार जाहीर

राज्य प्रतिनिधी -महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने (#महापारेषण) सामाजिक उत्तरदायित्व व प्रभावी जनसंपर्क क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. वर्ल्ड इनोव्हेशन अँड चेंज मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या वतीने महापारेषणला ‘पीआरओ पीआर ग्लोब सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कम्युनिकेशन अचिव्हमेंट अवॉर्ड्स-२०२५’ या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांतर्गत सर्वोत्कृष्ट मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण २८ जानेवारी २०२६ रोजी रोम (इटली) येथे होणाऱ्या पीआरओ पीआर रोमन फोरम या आंतरराष्ट्रीय परिषदेत होणार आहे. या वर्षी सहा खंडांतील एकूण ७६ आंतरराष्ट्रीय परीक्षकांनी विविध संस्थांच्या संवाद, सामाजिक उत्तरदायित्व व जनसंपर्क प्रकल्पांचे मूल्यांकन केले. त्यामध्ये महापारेषणला ‘सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कम्युनिकेशन अचिव्हमेंट’ या श्रेणीत जगातील अव्वल तीन संस्थांमध्ये स्थान मिळाले आहे.

महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांनी यशाचे श्रेय जनसंपर्क विभाग व त्यांच्या टीमवर्कला दिले आहे. सृजनशील व नावीन्यपूर्ण काम व मीडियात सातत्याने होणारे नवे बदल समजून जनसंपर्क विभागाने कामांमध्ये वैविध्यता आणून सकारात्मक बदल केले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून जनसंपर्क विभाग नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. भविष्यातही, महापारेषणचा जनसंपर्क विभाग सातत्यपूर्ण कामगिरी करून महापारेषणचे नाव उंचावेल, असा विश्वास त्‍यांनी व्यक्त केला.

संबंधित पोस्ट

बृहन्मुंबई महानगरपालिका चुनाव 2025-26- सायन विधानसभा क्षेत्रातील-राजकीय पक्षनिहाय विजयी संख्या व मिळालेली वैध मते बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर

vishwatmaklokswamivarta

कृषी विभागाने गावनिहाय शिबिराचे आयोजन करुन ॲग्रीस्टॅक नोंदणी करावी – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

सार्वजनिक, खाजगी क्षेत्रातील आस्थापनांना त्रैमासिक विवरणपत्र तात्काळ सादर करण्याचे आवाहन

सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरिता राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन 5 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सक्षम – मंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा