vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

राष्ट्रीय पोषण माह २०२६ चा शुभारंभ ११ सप्टेंबर रोजी

राष्ट्रीय पोषण माह २०२६ चा शुभारंभ ११ सप्टेंबर रोजी

 

मुंबई, प्रतिनिधी : महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या अंतर्गत राष्ट्रीय पोषण माह २०२६ चा शुभारंभ कार्यक्रम महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मुख्य उपस्थितीत ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता यशवंतराव चव्हाण मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आला आहे

या शुभारंभ कार्यक्रमास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त वर्षा लड्डा, एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त माधवी सरदेशमुख उपस्थित राहणार आहेत.

९ वा राष्ट्रीय पोषण माह २०२६, ‘माझी अंगणवाडी माझी जबाबदारी’ या संकल्पनेवर आधारित आहे. पोषण अभियानांतर्गत दरवर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय पोषण माह साजरा करण्यात येतो. गर्भवती महिला, स्तनदा माता, बालके, किशोरवयीन मुले-मुली आणि त्यांच्या कुटुंबांमध्ये पोषण, आरोग्य व संगोपनासंदर्भात व्यापक सहभागातून सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने हा पोषण माह साजरा केला जातो.

यंदाचा पोषण माह हा पुरेशा प्रथिनांचे सेवन, विविध पुरेशा प्रथिनांचे सेवन, विविध अन्नगटांचा समावेश आणि स्थानिक अन्नपदार्थांवर भर देऊन आहारातील विविधतेस प्रोत्साहन देणे. नव्याने गठित अंगणवाडी व्यवस्थापन समित्या आणि एसएनपी मेनू बोर्ड यांच्या माध्यमातून पोषणासाठी समुदायाची मालकी व उत्तरदायित्व बळकट करणे. प्रारंभिक बाल संगोपन व शिक्षणामध्ये ईसीसीई संज्ञानात्मक विकास आणि पुरेसे पोषण हे मूलभूत घटक म्हणून प्रोत्साहित करणे तसेच बालक काय खाते आणि कसे शिकते यामधील अविभाज्य संबंध अधोरेखित करणे. याचबरोबर प्रधानमंत्री मातृ वंदना योजना या भारतातील प्रमुख मातृत्व लाभ योजनेची १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मातृ पोषण, आरोग्यविषयक सकारात्मक सवयी, गर्भावस्थेदरम्यान आर्थिक सहाय्य आणि जीवनातील पहिल्या १००० दिवसांतील मातृ पोषण व संगोपनाचे महत्त्व अधोरेखित करण्यावर या पोषण माहमध्ये भर देण्यात येणार आहे.

0000

संबंधित पोस्ट

प्राथमिक आरोग्य केंद्र बाबरा येथे जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची आकस्मिक भेट,आरोग्य सेवांचा आढावा; गुणवत्तापूर्ण व वेळेत सेवा देण्याच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

अकोले, कोपरगाव, संगमनेर येथील रुग्णालयांचे १०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन ; राज्य शासनाची मान्यता,जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणावर भर : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवाच्या मंचावरून ‘लोकसंवाद-२०२६’; नांदुरा येथे आरोग्य विषयक जनजागृती

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे 12 ऑगस्ट रोजी आयोजन

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यांत सेवा संकल्प अभियानअंतर्गत महाराजस्व समाधान शिबिर

जिल्ह्यात १४ वर्षीय मुलींसाठी ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीम९ मार्चपासून सुरुवात