vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

हिंद दी चादर शहीदी समागमात हजारो भाविकांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

हिंद दी चादर शहीदी समागमात हजारो भाविकांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

 

     नवी मुंबई- प्रतिनिधी- हिंद दी चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने भाविकांना दोन दिवस वैद्यकीय सेवा देण्यात आली. देशभरातून आलेल्या हजारो भाविकांनी या सेवेचा लाभ घेतला असल्याची माहिती नवी मुंबईचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत जवादे यांनी दिली.  यावेळी ६० पेक्षा जास्त लोकांनी रक्त दान केले असून, किरकोळ त्रास झाlलेल्या १७ रुग्णांना सेवा देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

श्री गुरु तेग बहादुर साहेब जी दरबार मध्ये येणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य तपासणी तसेच मोफत चष्मा वाटपाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती नवी मुंबईचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे यांनी दिली.

    हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर यांच्या शहिदी समागम निमित्त खारघर, नवी मुंबई येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून येणाऱ्या भाविकांसाठी उत्तम आरोग्य व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि अपंगांसाठ

व्हील चेअर तसेच ने आण करण्यासाठी ई – वेहिकल उपलब्ध करण्यात आली आहे. वातावरणात गारवा रहावा म्हणून mist वेहिकलचा वापर करण्यात येत आहे.

 येथे येणाऱ्या भाविकांसाठी ५० वैद्यकीय तज्ज्ञ १०० पॅरामेडिकल स्टाफ सेवेसाठी उपलब्ध आहे. येथे मोफत औषध पुरवठा करण्यात येत आहे. सर्जरी, दंत विशेष तज्ञ, ऑर्थोपेडिक, 20 ऑक्सीजनची उपलब्धता तसेच आपातकालीन परिस्थितीत ची स्थापना करण्यात आली आहे. रक्तदान शिबिरही येथे सुरू आहे. मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी, फिजिओथेरपी सेवा, हाडवैद्य विशेषतज्ज्ञ, कॅन्सर स्क्रिनिंग, स्त्री रोग विशेषतज्ज्ञ, कान नाक, घसा तज्ज्ञ, मेडिकल, पॅरामेडिकलचे १०० स्टाफ येथे उपलब्ध आहे. थेलेसिमीया या आजाराबद्दल येथे प्रबोधन करण्यात येते.

०००

संबंधित पोस्ट

ससून रुग्णालयात जागतिक थॅलेसेमिया दिन उत्साहात साजरा

कृत्रिम हात पाय व कॅलिपर्स मोजमापासाठी ऑन द स्पॉट नि शुल्क तपासणी व साहित्य वाटप शिबीराचे आयोजन  

अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया अभियान’ जोमाने ; राज्य नोडल अधिकारी डॉ. कानगुले यांच्याकडून क्षेत्रीय पाहणी व मार्गदर्शन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात राष्ट्रीय पोषण पंधरवड्याचे आयोजन 

अमरावती जिल्हा उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज; ‘इन-क्रिस’ प्रकल्पांतर्गत उपाययोजनांना वेग..

जागतिक तंबाखू मुक्ती दिनानिमित्त मंत्रालयात जनजागृती कार्यक्रम तंबाखूचे अतिसेवन म्हणजे अनंत आजारांना निमंत्रण राज्यभर तंबाखू प्रतिबंध उपक्रम…