vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

केंद्र सरकारकडून राज्यांना १ लाख ९ हजार कोटींचे कर वितरण; महाराष्ट्राला ७ हजार २२ कोटींचा अतिरिक्त निधी

केंद्र सरकारकडून राज्यांना १ लाख ९ हजार कोटींचे कर वितरण; महाराष्ट्राला ७ हजार २२ कोटींचा अतिरिक्त निधी…

नवी दिल्ली, प्रतिनिधी : राज्यांच्या वित्तीय व्यवस्थेला बळकटी देत विकासकामांना अधिक गती मिळावी, या उद्देशाने केंद्र सरकारने आज सर्व राज्यांना १ लाख ९ हजार कोटी रुपयांच्या कर वितरणाची अतिरिक्त अग्रीम हप्ता वितरित केला आहे.राज्यनिहाय वाटपानुसार, महाराष्ट्राला ७ हजार २२ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी प्राप्त झाला आहे.

 

केंद्र शासनाने ही रक्कम १० ऑगस्ट रोजी होणाऱ्या नियमित मासिक कर हस्तांतरणाव्यतिरिक्त वितरित केली आहे. या अतिरिक्त निधीमुळे राज्यांना पायाभूत सुविधा उभारणी, विविध विकास प्रकल्प, भांडवली खर्च तसेच प्राधान्याच्या लोककल्याणकारी योजनांसाठी आवश्यक आर्थिक तरतूद अधिक प्रभावीपणे करता येणार आहे. यामुळे विकासकामांच्या अंमलबजावणीला गती मिळण्यास आणि निधी नियोजन अधिक सक्षमपणे करण्यास मदत होणार आहे.

महाराष्ट्राला प्राप्त ७ हजार २२ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीमुळे राज्यातील विविध विकास प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या कामांना अधिक चालना मिळणार आहे.

 

००००

संबंधित पोस्ट

नांदेड जिल्ह्यात बारावीची परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,कठोर नियंत्रण, झूम वेबकास्ट व ड्रोन चित्रीकरणामुळे प्रशासनाचे यश पुढील सर्व परीक्षांसाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय यंत्रणा सक्रिय..

पु. ल. देशपांडे म्हणजे राज्याचा हॅप्पीनेस इंडेक्स – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नूतनीकृत पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नव्या संकुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

नवी मुंबई महानगरपालिका  पाणी बचतीबाबतचे नियोजन• नागरिकांमध्ये विविध माध्यंमाद्वारे पाणी बचतीवाचत आवाहन करण्यात येत आहे.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आता मुंबईतही होणारपर्यटन सुरक्षा दलाचा शुभारंभ  – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा राज्य सरकार चा निर्णय ऐतिहासिक ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाचे पाठीराखे*

vishwatmaklokswamivarta

पत्रकारांबद्दल हिन भावना ठेवणार्‍या डॉक्टरांवर कारवाईची मागणी पीसीएम जालनाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

vishwatmaklokswamivarta