vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जेष्ठ साहित्यिक कलाकार यांनी मानधनासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जेष्ठ साहित्यिक कलाकार यांनी मानधनासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्यातील मान्यवर जेष्ठ साहित्यिक व प्रयोगात्मक कलामध्ये पूर्णवेळ चरितार्थ अवलंबून असलेले कलाकार यांना राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजने अंतर्गत मानधन देण्यात येणार आहे. सदर योजने अंतर्गत 31 जुलै 2026 अखेर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत

पात्रता : ज्यांचे वय ५० पेक्षा जास्त आहे. दिव्यांगांना वयाची अट १० वर्षाने शिथील करण्यांत येत आहे. (दिव्यांगांना वयोमर्यादा ४०वर्षे) ज्यांचे कला व साहित्य क्षेत्रातील योगदान कमीत कमी १५ वर्षे आहे.ज्यांनी साहित्य व कलाक्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार व मोलाची भर घातली आहे. वयाने जेष्ठ असणारे, विधवा/परितक्ता. कलाकाराचे सर्व मार्गानी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६०,०००/- पेक्षा जास्त नसावे. ज्या कलाकारांची उपजिविका फक्त कलेवरच अवलंबुन आहे असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते. मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार. केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे इतर कोणत्याही नियमित मासीक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार. कलाकार / साहित्यिक महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.

तरी वरील प्रमाणे पात्र असलेल्या कलाकारांनी अर्जासोबत वयाचा दाखला, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, पती व पत्नीचा एकत्रित फोटो (लागू असल्यास), बँक तपशील दिव्यांग दाखला (लागू असल्यास), राज्य व केंद्र सरकारचे पुरस्कार प्रमाणपत्र (लागू असल्यास), नामांकित संस्था/व्यक्ती यांचे शिफारस पत्र (लागू असल्यास) व विविध पुरावे इ. कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तरी लाभार्थ्यानी https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en या लिंकवर पर्यटन व सांस्कृतीक कार्य विभाग अंतर्गत नोंदणी करावी

0000

संबंधित पोस्ट

डावी लोकशाही आघाडीने जालना महानगर पालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपला पाठींबा जाहीर

vishwatmaklokswamivarta

कुकडी व घोड प्रकल्पातील प्रलंबित कामांचा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला आढावा,कालवा दुरुस्तीसाठी निधी कमी पडू देणार नाही

संगीताद्वारे आध्यात्मिक उन्नती’ या विषयावर परिसंवाद; कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग-संगीताच्या माध्यमातून साधना करण्यासाठी मार्गदर्शन करणारे गोव्यातील प्रस्तावित विश्वविद्यालय लवकर व्हावे ! – पू. पं. केशव गिंडे*

पिंपरी चिंचवड महापालिका व दिव्यांग भवन यांच्या वतीने १७ ते १९ जानेवारी दरम्यान मोरवाडी येथील ऑटो क्लस्टर मैदानावर आयोजित ‘पर्पल जल्‍लोष’ या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते…

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अन्वये एकदिवसीय जिल्हा परिषद ठाणे येथे संवेदनशीलता कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सैनिकी शाळांच्या शैक्षणिक सुधारणांसाठी राज्यस्तरीय समिती गठीत करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री अतिथीगृह येथे सैनिकी शाळांच्या धोरणात सुधारणा करण्याबाबत आढावा बैठक