vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे जिल्ह्यात दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अन्वये एकदिवसीय जिल्हा परिषद ठाणे येथे संवेदनशीलता कार्यशाळा

ठाणे जिल्ह्यात दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अन्वये एकदिवसीय जिल्हा परिषद ठाणे येथे संवेदनशीलता कार्यशाळा

 

ठाणे, प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे) — दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ (RPWD Act 2016) कलम ३९ अंतर्गत दिव्यांग व्यक्तींबाबत संवेदनशीलता व जागरूकता निर्माण करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार एकदिवसीय कार्यशाळेचे आज, दि.‌५ डिसेंबर, २०२५ रोजी बी. जे. हायस्कूल, कोर्ट नाका, ठाणे येथे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व विभाग विविध शासकीय विभागांतील अधिकारी उपस्थित होते.

कार्यशाळेचे प्रास्ताविक उज्वला सपकाळे यांनी करत दिव्यांग व्यक्तींच्या अधिकारांविषयी जागरूकता वाढविण्याचे महत्व अधोरेखित केले.

 राष्ट्रीय न्यास ( National Trust Act) कायदा याविषयावर दीपिका शेरखाने दिव्यांग विभागप्रमुख यशवंतराव चव्हाण सेंटर यांनी मार्गदर्शन केले. विनित भागोजी प्रकल्प व्यवस्थापक व त्यांच्या सहकारी खुशी गणोञा नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेंट फॉर डिसॅबल पिपल यांनी RPWD Act 2016 व कलम ३९ बाबत सविस्तर माहिती या विषयावर, सामाजिक कार्यकर्त्या दिव्यांगांसाठी उपलब्ध सुविधा, प्रत्यक्ष अनुभवावरील चर्चासत्र यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले.

यावेळी तहसीलदार संदिप थोरात, विभाग प्रमुख कृषी विभाग मुनिर बाचोटिकर, सहाय्यक सल्लागार दिव्यांग सक्षमीकरण संगिता शिर्के, सल्लागार ज्येष्ठ नागरिक विभाग यशवंतराव चव्हाण सेंटर एड. प्रमोद ढोकळे, समग्र शिक्षा सर्वसमावेशक शिक्षण अनिल कुऱ्हाडे, सूत्रसंचालनाची जबाबदारी दीपक साळुंखे यांनी समर्थपणे पार पाडली.

कार्यशाळेचा उद्देश शासकीय अधिकारी व विभाग प्रमुखांना दिव्यांग व्यक्तींच्या अधिकारांविषयी संवेदनशील करणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे, त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि सर्वसमावेशक समाजनिर्मिती करण्यासाठी प्रशासनाची भूमिका अधिक दृढ करणे हा होता.

ठाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय स्थापनांचे विभाग प्रमुख, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि दिव्यांग क्षेत्रात कार्यरत संस्था कार्यशाळेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या.

०००

संबंधित पोस्ट

गंगापूर धरण परिसरात होणाऱ्या ‘एअर शो’चे सूक्ष्म नियोजन करावे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांचे आढावा बैठकीत निर्देश

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर; पालघरमध्ये ‘माउंटन टनेल-६’चे खोदकाम पूर्ण

vishwatmaklokswamivarta

मौजे सोमनाथ (ज.) ता.जालना येथील सुरेश एखंडे यांचाभाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

भाजपा जालना महानगर जिल्ह्याच्या वतीने वंदेमातरम् गीताची १५० वर्षपूर्ती साजरी वंदेमातरम् गीताचे वंदेमातरम् हे दोन शब्द ऐकताच राष्ट्रभक्ती जागृत होते – माजी आमदार कैलास गोरंटयाल

vishwatmaklokswamivarta

मुंबई भूमिगत मेट्रो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे*भारताचा वेग आणि विकास अधोरेखित- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पायाभूत सुविधांमधील मोठी गुंतवणूक, तरुणांसाठी रोजगार संधी आणि विकसित भारताच्या दिशेने मजबूत पाऊल…

वायू व ध्वनी प्रदूषण प्रतिबंधात्मक मानक कार्यप्रणालीतील नियमांचे उल्लंघन करणा-या18 विकासकांवर बांधकाम स्थगितीची (Stop Work) कारवाई..

vishwatmaklokswamivarta