vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक सभासद नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक सभासद नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

ठाणे, प्रतिनिधी :- महाराष्ट्र शासन विभागामार्फत राज्यातील ऑटोरिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ, मुंबई या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे.

या मंडळाचे सभासद होण्याकरीता शासनाने ऑनलाईन विधा उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. तसेच नोंदणी शुल्क व ओळखपत्र शुल्काची रक्कम राज्यस्तरीय मंडळ यांनी वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे असेल. सध्या यासाठीचे नोंदणी शुल्क व ओळखपत्र शुल्काची रक्कम रुपये 500/- राहील. तसेच वार्षिक सभासद शुल्क रक्कम रुपये 300/- राहिल. शुल्क भरणा करणे बंधनकारक आहे. सदर नोंदणी शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरणा करावयाचे आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटची https://ananddighekalyankarimandal.org ही लिंक दिलेली आहे. या लिंकव्दारे ऑटोरिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक सभासद नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करु शकतात.

वरील लिंकव्दारे रिक्षा चालक आणि टॅक्सीचालक सभासद नोंदणीसाठी सोबत जोडलेल्या चार्टप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने अर्ज करु शकतात, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण, आशुतोष बारकुल यांनी कळविले आहे.

000000

संबंधित पोस्ट

चित्रपटसृष्टीतील अभिनयाचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड -उपमुख्यमंत्री अजित पवार ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

चिखली चे गट शिक्षण अधिकारी विरुद्ध कारवाई न झाल्याने दुसऱ्या दिवशी उपोषण सुरु शिक्षणाधिकारी प्राथमिक हेच पाठीशी घालत आहे

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून माणुसकीची दिवाळी-पूरग्रस्तांच्या मदतीसाठी क्यू आर कोड द्वारे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले स्वेच्छा निधी संकलन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू अभियान….

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन गेल्या सहा महिन्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर उपलब्ध

नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीतून दोषसिद्धी वाढवावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- पोलीस दलाच्या बैठकीत घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा – बेपत्ता महिलासंदर्भात गुन्हे निर्गतीपर्यंत पाठपुरावा करावा- मालमत्ताविषयक गुन्ह्यात हस्तगत माल परत देण्याचे प्रमाण वाढवावे- संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमिवर यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचना