vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

वैध मापन शास्त्र कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन

वैध मापन शास्त्र कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन

जालना प्रतिनिधी :- वैध मापनशास्त्र यंत्रणेच्या कार्यपध्दतीत पारदर्शकता वाढविणे, लोकसंपर्क दृढ करणे आणि ग्राहक तक्रारीचे वेळेवर निराकरण करणे या उद्देशाने जिल्हा कार्यालयामध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जनता दरबार आयोजित करण्यात येणार आहे.

जनता दरबार या उपक्रमाच्या माध्यमातून सामान्य ग्राहक, ग्राहक संघटना, पॅकबंद वस्तुंचे उत्पादक, किरकोळ विक्रेते व व्यापारी, वजन व मापाचे परवानाधारक या घटकांना थेट संवाद साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. उप नियंत्रक वैध मापन शास्त्र, जालना जिल्हा, विकास लॉज, न्यु एमआयडीसी छत्रपती संभाजीनगर रोड, जालना या कार्यालयात जनता दरबार आयोजित केला जाणार आहे. असे उपनियंत्रक, वैधमापनशास्त्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

000000-*-*-

संबंधित पोस्ट

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनाऑनलाईन नोंदणीसाठी 31 डिसेंबरची मुदत 

vishwatmaklokswamivarta

महिलासक्षमीकरणजिद्दीच्या जोरावर ‘ती’ने घडविले प्रगतीचे लेणे..!शहापूरच्या सौ. प्रतिक्षा बेहरे यांचा प्रेरणादायी प्रवास

हिवारा शाखा कार्यालयात डाक चौपाल कार्यक्रम संपन्न

अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती” योजनेचा लाभ घेण्यासाठी मातंग समाजातील विद्यार्थी/विद्यार्थीना दि.20 जुलै 2025 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

महाराष्ट्र जीएसटी विभागामार्फत १९२.४५ कोटी इनपुट टॅक्स क्रेडिटचा गैरवापर व करचोरी प्रकरणी एकास अटक

शेळीपालन, कुक्कुटपालन व गाय-म्हैस पालन प्रशिक्षणासाठी बुलडाण्यात पाच दिवसीय शिबिर